IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचे शाब्दिक खेळ सुरू, विराटच्या सुट्टीवर दिली प्रतिक्रिया

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचे शाब्दिक खेळ सुरू, विराटच्या सुट्टीवर दिली प्रतिक्रिया

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना झाली आहे. कोरोना व्हायरसनंतर भारतीय टीम पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणार आहे. भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. पण या दौऱ्यातली पहिली टेस्ट झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे.

  • Share this:

मेलबर्न, 15 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना झाली आहे. कोरोना व्हायरसनंतर भारतीय टीम पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणार आहे. भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. पण या दौऱ्यातली पहिली टेस्ट झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराटने पितृत्वाची सुट्टी घेतली आहे. जानेवरी महिन्याच्या सुरुवातीला अनुष्काला बाळ होणार आहे, त्यावेळी विराट तिच्यासोबत राहणार आहे, म्हणूनच तो संपूर्ण दौऱ्यासाठी उपलब्ध नसेल.

विराट कोहलीच्या या सुट्टीवरुन आता ऑस्ट्रेलियातून नेहमीप्रमाणे शाब्दिक खेळ सुरू झाले आहेत. विराटच्या अनुपस्थितीमुळे भारतीय टीमवर टेस्ट सीरिजमध्ये प्रभाव पडेल, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लॅन्गर (Justine Langer) यांनी केलं आहे, पण त्यांनी विराटच्या पितृत्वासाठी सुट्टी घेण्याच्या निर्णयाची प्रशंसा केली आहे.

'क्रिकेटपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देण्याच्या विराटच्या विचाराचा मी सन्मान करतो. मी जेवढे क्रिकेटपटू बघितले, त्यात विराट कोहली सर्वोत्तम आहे, याची कारणंही बरीच आहेत. फक्त बॅटिंगच नाही, तर तो ज्या उर्जेने खेळतो ती अविश्वसनीय आहे. मी त्याचा आदर करतो. तोदेखील आपल्याप्रमाणेच माणूस आहे. आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मावेळी तुम्ही पत्नीसोबत राहा, असा सल्ला मी आमच्या खेळाडूंनाही देईन,' असं लॅन्गर म्हणाला.

कोहली मेलबर्नची बॉक्सिंग डे टेस्ट (26-30 डिसेंबर), सिडनी टेस्ट (7-11 जानेवारी) आणि ब्रिस्बेन टेस्ट (15-19 जानेवारी) मध्ये खेळणार नाही. कोहलीच्या गैरहजेरीमुळे निश्चितच भारताचं नुकसान होईल, पण तरीही ऑस्ट्रेलिया कोणत्याही प्रकारची ढिलाई दाखवणार नाही, असं लॅन्गरने सांगितलं. 2018-19 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने 2-1 ने टेस्ट सीरिज जिंकली होती. ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकण्याचा विक्रम भारताने केला होता.

Published by: Shreyas
First published: November 15, 2020, 10:07 AM IST
Tags:

ताज्या बातम्या