वॉर्नरच्या निर्णयाने फ्रँचाइजीला मोठा धक्का, लीगमध्ये खेळणार नसल्यानं होणार नुकसान

वॉर्नरच्या निर्णयाने फ्रँचाइजीला मोठा धक्का, लीगमध्ये खेळणार नसल्यानं होणार नुकसान

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे नाही तर राष्ट्रीय संघाकडून खेळणार असल्यानं त्यानं असा निर्णय घेतला असल्याचं समजतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मार्च : कोरोनामुळे इंडियन प्रीमियर लीगमध्ये डेव्हिड वॉर्नर सहभागी होण्याची चिन्हे कमी आहेत. त्यातच आता वॉर्नरने फ्रँचाइजी आधारीत असलेल्या लीग द हंड्रेडमध्ये  न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या या हंगामत द हंड्रेड लीग सुरु करणार आहे. यामध्ये 100 चेंडूंचा खेळ खेळण्यात येईल. जुलैमध्ये सुरु होणाऱी ही स्पर्धा ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने द हंड्रेड लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. वॉर्नरला एका फ्रँचाइजीने खरेदी केलं होतं. त्याच्या या निर्णयामुळे संघाला मोठा फटका बसला आहे. साउथर्न ब्रेवने वॉर्नरसाठी एक कोटी 10 लाख रुपये इतकी किंमत मोजली होती. वॉर्नरनं हा निर्णय कोरोनामुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळं घेतलं आहे.

डेव्हिड वॉर्नरसाठी सध्या राष्ट्रीय संघाला प्राधान्य आहे. यामुळेच लीगमध्ये न खेळण्याचं ठरवलं असल्याचं समजतं. द हंड्रेड लीग ज्या काळात होणार आहे तेव्हाच ऑस्ट्रेलियाचा संघ झिम्बॉब्वेविरुद्ध खेळणार आहे. यामुळे फक्त वॉर्नरच नाही तर ऑस्ट्रेलियाच्या संघातील दिग्गज खेळाडूसुद्धा लीगमध्ये दिसणार नाहीत.

हे वाचा : लय भारी! कोरोनाला हरवण्यासाठी आता दिग्गज क्रिकेटपटू बनवतोय सॅनिटायझर

द हंड्रेड लीगमधून  स्‍टीव स्मिथ (Steve Smith), अॅरॉन फिंच, ग्‍लेन मॅक्‍सवेल, मिशेल स्‍टार्क, क्रिस लिन, नाथन कूल्‍टर नाइल, अॅडम झाम्पा आणि  डी आर्ची हेसुद्धा माघार घेण्याची शक्यता आहे. डेव्हिड वॉर्नरच्या मॅनेजरकूडन आधीच स्पष्ट कऱण्यात आलं होतं की आयपीएलचा 13 वा हंगाम झाला तर त्यात वॉर्नर भाग घेईल. पण कोरोनामुळे आयपीएल 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकललं आहे. तर परदेशी नागरिकांना 15 एप्रिलपर्यंत भारतात येण्यास बंदी असल्यानं खेळाडूंनाही आयपीएलसाठी येता येणार नाही.

हे वाचा : गोलंदाजांने चेंडू टाकल्यानंतर केला 'असा' खेळ, फलंदाजही झाला हैराण; पाहा VIDEO

First published: March 21, 2020, 7:20 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading