Home /News /sport /

Ashes Series कव्हर करणाऱ्या 2 पत्रकारांना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश

Ashes Series कव्हर करणाऱ्या 2 पत्रकारांना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series) दरम्यान धक्कादायक घटना घडली आहे.

    मुंबई, 20 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) दुसरी टेस्ट सध्या सुरू आहे. अ‍ॅडलेडमध्ये सुरू असलेल्या या टेस्टवर ऑस्ट्रेलियानं मजबूत पकड मिळवली आहे. आता शेवटच्या दिवशी (सोमवारी) ऑस्ट्रेलियन टीम विजयापासून 6 विकेट्स दूर आहे. या दोन्ही देशांच्या टेस्ट सीरिजकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. त्याचवेळी या सीरिजमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे सर्वांचं टेन्शन वाढलं आहे. अ‍ॅडलेड टेस्ट कव्हर करणाऱ्या मीडिया टीममधील 2 जण कोरोना पॉझिटिव्ह (Covid 19) आढळले आहेत. स्टेडियम प्रबंधन समितानं दिलेल्या माहितीनुसार नियमित कोरोना चाचणीमध्ये ही गोष्ट उघड झाली आहे. वेस्टर्न स्टँड मीडिया सेंटरमध्ये हे काम करत होते. या पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. एबीसी ग्रँडस्टँड टीमच्या सदस्यांमा मैदानातून प्रसारण करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया सरकारचा आरोग्य विभाग तसेच स्टेडियम प्रबंधन समितीच्या परवानगीशिवाय त्यांना मैदानातून प्रसारण करता येणार नाही, पण ते अन्य लांबच्या ठिकाणावरुन मॅचचं कव्हरेज करु शकतात. काय सांगता! महेंद्रसिंह धोनी नाही तर वीरेंद्र सेहवाग होता CSK ची पहिली चॉईस एबीसी ग्रँडस्टँडचे सदस्य एण्ड्रयू मूर यांनी आपल्याला हॉटेलच्या खोलीत थांबण्याचा आदेश मिळाल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर पुढील परवानगी मिळेपर्यंक  स्टेडियममध्ये जाण्यास देखील बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ब्रिटीश मीडियातील सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे, असा दावा अ‍ॅडलेडमधील स्थानिक मीडियानं केला आहे. ऑस्ट्रेलियन कॅप्टनला फटका दरम्यान, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स (Pat Cummins) दुसऱ्या टेस्टमध्ये खेळता आले नाही.  या टेस्टच्या आदल्या दिवशी एका हॉटेलमध्ये कमिन्स त्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्याला आयसोलेशनमध्ये जावे लागले. कमिन्सच्या अनुपस्थितीमध्ये स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ashes, Australia, Coronavirus, England

    पुढील बातम्या