Home /News /sport /

मुलाचं शतक हुकलं, अंपायरने मैदानातल्या अंपायरला दिली धमकी

मुलाचं शतक हुकलं, अंपायरने मैदानातल्या अंपायरला दिली धमकी

ऑस्ट्रेलिया (Australia) च्या एका ज्येष्ठ अंपायरला क्रिकेट बोर्डाने तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. गेरार्ड अबूद (Gerard Abood) असं या अंपायरचं नाव आहे.

    सिडनी, 28 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया (Australia) च्या एका ज्येष्ठ अंपायरला क्रिकेट बोर्डाने तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. गेरार्ड अबूद (Gerard Abood) असं या अंपायरचं नाव आहे. आपल्या मुलाला रन आऊट दिल्यानंतर वाद घातल्यामुळे आणि अपशब्द वापरल्यामुळे गेरार्ड अबूद यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 15 नोव्हेंबरला सिडनीमध्ये अंडर-13 मॅचमध्ये गेरार्ड यांच्या मुलाला शेवटच्या बॉलवर 98 रनवर रन आऊट देण्यात आलं. मुलाला रन आऊट दिल्यानंतर गेरार्ड यांनी मैदानातल्या अंपायरच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. या घटनेनंतर सेंट जॉर्ज डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी बोर्डाने गेरार्ड यांचं वर्तन क्रिकेटच्या भावनेला ठेच पोहोचवणारं असल्याचं सांगितलं. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गेरार्ड यांना स्वैच्छिक सेवा करायला सांगितली आहे. त्यामुळे आता पुढचे 12 महिने त्यांना एनएसडब्ल्यूच्या माध्यमातून स्थानिक अंपायरना प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. गेरार्ड यांनी मैदानातल्या अंपायरसोबत गैरवर्तन आणि अपशब्द वापरल्याचे आरोप स्वीकारलेले नाहीत. पण चुकीच्या पद्धतीने निर्णयाला आव्हान दिल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार 9 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायर राहिलेले गेरार्ड म्हणाले, 'मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं मान्य करतो, त्यामुळे मी माफी मागतो.' मुलाला आऊट दिल्यानंतरही या मॅचच्या निकालावर परिणाम झाला नाही. सेंट जॉर्ज डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनविरुद्ध त्यांच्या मुलाची टीम इनर वेस्ट हार्बरचा तीन विकेटने पराभव झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या