Home /News /sport /

.... आणि बोलता-बोलता थेट Swimming Pool मध्ये पडला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, पाहा VIDEO

.... आणि बोलता-बोलता थेट Swimming Pool मध्ये पडला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स (Pat Cummins) सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

  मुंबई, 10 मार्च : ऑस्ट्रेलियाची टीम 24 वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर (Australia tour of Pakistan) आली आहे. या दौऱ्यातील पहिली टेस्ट रावळपिंडीमध्ये झाली. त्यानंतर आता दोन्ही टीम पुढील टेस्टची तयारी करत आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स (Pat Cummins) सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर अ‍ॅलेक्स कॅरीचा (Alex Carey) हा व्हिडीओ आहे. टीमच्या हॉटेलमध्ये चालताना कॅरी बोलण्यात इतका मग्न होता की तो थेट हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये (Swimming Pool) पडला. कॅरी पूलमध्ये पडला तेव्हा त्याच्या खांद्यावर बॅग आणि खिशात मोबाईल देखील होता.  कमिन्सनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Pat Cummins (@patcummins30)

  ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान यांच्यात रावळपिंडीमध्ये झालेल्या टेस्टमध्ये एकूण 14 विकेट्स पडल्या. त्यामुळे या पिचवर जोरदार टीका होत आहे. कॅरीनं रावळपिंडी टेस्टमध्ये 19 रन काढले. आता दोन्ही देशांमधील दुसरी टेस्ट 12 मार्चपासून कराचीमध्ये होणार आहे. तर तिसरी आणि शेवटची टेस्ट 21 मार्चपासून लाहोरमध्ये खेळली जाणार आहे. त्यानंतर तीन मॅचची वन-डे सीरिज होणार असून सर्वात शेवटी एकमेव टी20 सामना खेळला जाणार आहे. Women's World Cup : टीम इंडियाच्या दिग्गजांची निराशा, न्यूझीलंड विरूद्ध मोठा पराभव कराची टेस्टपूर्वी पाकिस्तानला एक धक्का बसला आहे. पाकिस्तानचा ऑल राऊंडर फहीम अश्रफला कोरोनाची लागण झाली आहे. फहीमला पाकिस्तान सुपर लीग (PSL 2022) स्पर्धेच्या दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो रावळपिंडी टेस्टमध्ये खेळलेल्या पाकिस्तान टीमचा सदस्य नव्हता. कराची टेस्टसाठी टीमच्या हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचं आढललं. आता फहीमला आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Australia, Cricket news, Pakistan, Video viral

  पुढील बातम्या