मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ऑस्ट्रेलियाला T20 वर्ल्ड कप जिंकून देणारा स्टार घेणार निवृत्ती, Ashes मधूनही बाहेर

ऑस्ट्रेलियाला T20 वर्ल्ड कप जिंकून देणारा स्टार घेणार निवृत्ती, Ashes मधूनही बाहेर

ऑस्ट्रेलियानं यंदा अनेकांचे अंदाज चुकवत टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं (T20 World Cup) विजेतेपद पटकावलं आहे. या विजेतेपदामधील स्टार खेळाडू सध्या निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे.

ऑस्ट्रेलियानं यंदा अनेकांचे अंदाज चुकवत टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं (T20 World Cup) विजेतेपद पटकावलं आहे. या विजेतेपदामधील स्टार खेळाडू सध्या निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे.

ऑस्ट्रेलियानं यंदा अनेकांचे अंदाज चुकवत टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं (T20 World Cup) विजेतेपद पटकावलं आहे. या विजेतेपदामधील स्टार खेळाडू सध्या निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 18 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियानं यंदा अनेकांचे अंदाज चुकवत टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं (T20 World Cup) विजेतेपद पटकावलं आहे. रविवारी (14 नोव्हेंबर) दुबईत झालेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा (Australia vs New Zealnad) 8 विकेट्सनं एकतर्फी पराभव केला. यापूर्वी ऑस्ट्रेलियानं सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव केला होता. आता पुढील टी20 वर्ल्ड कप पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियातच होणार आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर हे विजेतेपद राखण्याचं ऑस्ट्रेलियन टीमसमोर आव्हान आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तानवरील विजयात विकेट किपर - बॅटर मॅथ्यू वेडचं (Mathhew Wade) मोलाचं योगदान होतं. वेडनं पाकिस्तान विरुद्ध 17 बॉलमध्ये 41 रनची खेळी केली होती. त्यानं शाहीन आफ्रिदीला सलग तीन सिक्स लगावत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2022) निवृत्ती घेण्याच्या वेड विचारात आहे.

'पुढील वर्षी होणारा वर्ल्ड कप ही माझी प्रेरणा आहे. त्या वर्ल्ड कपमध्ये खेळायला मिळेल अशी मला आशा आहे. आम्हाला हा वर्ल्ड कप आमच्याकडेच ठेवायचा आहे. त्यानंतर मी निवृत्ती घेऊ शकतो. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट तरी नक्कीच खेळणार नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या फायनलपूर्वी ट्रेनिंग करताना स्नायू दुखावले होते, असा खुलासाही वेडनं यावेळी केला आहे.

'मॅचच्या आदल्या रात्री मी थोडा काळजीत होतो. उद्या सकाळी बॅटींग करता आली नाही, तर मी फायनलमध्ये खेळू शकलो नसतो. आम्हाला पहिल्यांदा बॅटींग करावी लागली आणि मला आक्रमक खेळावं लागलं तर ही दुखापत वाढेल आणि मी विकेट किपिंग करू शकणार नाही. त्याचा टीमला फटका बसेल.' याची मला काळजी होती. वेड फायनलमध्ये खेळणार की नाही याबबत ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंच देखील काळजीत होता.

IND vs NZ: चहर Live मॅचमध्ये शोधत होता गर्लफ्रेंड, बहिणीनं शेअर केला VIDEO

अ‍ॅशेससाठी निवड नाही

इंग्लंड विरुद्धची प्रतिष्ठेची अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series 2021-22) पुढील महिन्यात सुरू होत आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर ही स्पर्धा जिंकण्याचं ऑस्ट्रेलियाचं ध्येय आहे. या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन टीम जाहीर झाली आहे. यामध्ये ) सेमी फायनल जिंकून देणारा मॅथ्यू वेड (Matthew Wade) आणि फायनलमधील 'मॅन ऑफ द मॅच' मिचेल मार्शचा  (Mitchell Marsh) टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. मॅथ्यू हेडच्या जागेवर ट्रेविस हेडचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.

First published:

Tags: Australia, T20 world cup