धक्कादायक खुलासा : गर्लफ्रेंडच्या भावानंच केलं होतं क्रिकेटपटूचं अपहरण!

धक्कादायक खुलासा : गर्लफ्रेंडच्या भावानंच केलं होतं क्रिकेटपटूचं अपहरण!

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टुअर्ट मॅकगिल (Stuart Macgill) याच्या अपहरण प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.

  • Share this:

सिडनी, 7 मे: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टुअर्ट मॅकगिल (Stuart Macgill)  याच्या अपहरण प्रकरणात  धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणात चार जणांना बुधवारी अटक करण्यात आली होती. या आरोपींमध्ये मॅकगिल याची गर्लफ्रेंड  मारिया ओ मियेघेर हिच्या भावाचा देखील समावेश आहे. 50 वर्षांच्या मॅकगिलचं 14 एप्रिल रोजी सिडनी (Sydney) येथील राहत्या घरातून अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणात न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी (New South Wales Police) बुधवारी चार जणांना अटक केली. त्यामध्ये मारिनो या एका आरोपीचा समावेश  असून तो मॅकगिलच्या गर्लफ्रेंडचा भाऊ आहे.

ऑस्ट्रेलियन मीडियानं या प्रकरणात दिलेल्या वृत्तानुसार, स्टुअर्ट मॅकगिल यांची गर्लफ्रेंड मारिया एका रेस्टॉरंटची मालक आहे. तर मॅकगिल तिथं जनरल मॅनेजर म्हणून काम करतात. अपहरण प्रकरणात भावाचं नाव आल्यानं मारियाला धक्का बसला आहे. आपला भावाशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध नव्हता, असा दावा मारियानं केलाय.

'मी आणि मॅकगिल एकत्र असून प्रचंड घाबरलेले आहोत. मला असुरक्षित वाटत आहे. हे काय घडत आहे ते मला अजूनही समजत नाही. मी आणि माझा भाऊ यांचं आयुष्य वेगळं आहे. आम्ही एकमेकांपासून लांब राहतो. सध्या मॅकगिल सुरक्षित आहे." असं मारियानं 'डेली टेलिग्राफ' शी बोलतााना सांगितलं.

IPL 2021: असुरक्षित Bio Bubble आणि घाबरलेले खेळाडू! स्पर्धा स्थगित होण्याची Inside Story

काय आहे प्रकरण?

मॅकगिल यांचं 14 एप्रिल रोजी  घरातून काही जणांनी अपहरण केलं आणि त्याला जबरदस्तीनं कारमध्ये बसवून दक्षिण पश्चिम ऑस्ट्रेलियातील एका शहरात नेण्यात आले. त्यानंतर त्याचे ठिकाण बदलण्यात आले आणि जीवे मारण्याची धमकी देऊन सुटका केली. या अपहरणाची बातमी 20 एप्रिल रोजी सार्वजनिक झाली. मॅकगिलनं अपहरणानंतर 6 दिवस हॉटेलमध्ये घालवले आणि त्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली.

Published by: News18 Desk
First published: May 7, 2021, 2:28 PM IST

ताज्या बातम्या