मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'शेन वॉर्न पाठवायचा अश्लील मेसेज', 52 वर्षांच्या क्रिकेटपटूवर TV स्टारचा खळबळजनक आरोप, म्हणाली...

'शेन वॉर्न पाठवायचा अश्लील मेसेज', 52 वर्षांच्या क्रिकेटपटूवर TV स्टारचा खळबळजनक आरोप, म्हणाली...

ऑस्ट्रेलियन टीव्ही स्टार जेसिका पॉवरनं (Jessica Power) महान क्रिकेटपटू शेन वॉर्नवर (Shane Warne) खळबळजनक आरोप केला आहे.

ऑस्ट्रेलियन टीव्ही स्टार जेसिका पॉवरनं (Jessica Power) महान क्रिकेटपटू शेन वॉर्नवर (Shane Warne) खळबळजनक आरोप केला आहे.

ऑस्ट्रेलियन टीव्ही स्टार जेसिका पॉवरनं (Jessica Power) महान क्रिकेटपटू शेन वॉर्नवर (Shane Warne) खळबळजनक आरोप केला आहे.

मुंबई, 5 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर शेन वॉर्नची (Shane Warne) मैदनाबाहेरची प्रतिमा ही नेहमीच वादग्रस्त आहे. त्याच्यावर आजवर वेगवेगळे आरोप करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियन टीव्ही स्टार जेसिका पॉवरनं (Jessica Power) शेन वॉर्ननं तिला पाठवलेल्या अश्लिल मेसेजचं सत्य जगसमोर मांडलं आहे. बिग ब्रदर व्हीआयपी (Big Brother VIP) या कार्यक्रमात बोलताना जेसिकानं 52 वर्षांच्या क्रिकेटपटूवर हा खळबळजनक आरोप केला आहे.

'शेन वॉर्ननं मला घाणेरडे मेसेज पाठवले. तसंच तो सनकी आणि वेडा आहे. त्याचे मेसेज मला मिळाले तेव्हा 52 वर्षांचा माजी क्रिकेटपटू अशा प्रकारचं कृत्य करु शकतो. इतके घाणेरडे मेसेज पाठवू शकतो, यावर माझा विश्वास बसला नाही.' असं जेसिकानं सांगितलं.

जेसिका पुढे म्हणाली की, 'सलग दोन आठवडे शेन वॉर्न मला मेसेज करत होता. हे खरंच विचित्र होतं. तो सनकी आहे. तो ज्या काही गोष्टी मला पाठवत होता. त्या चांगल्या नव्हत्या. प्रचंड खराब होत्या मी इतकेच सांगू शकते. मी त्याला अगदी कमी उत्तर दिलं. तो सतत संकटात सापडतो यामध्येही काही आश्चर्य नाही. तुम्ही एक प्रसिद्ध व्यक्ती आहात, तर अशा प्रकारचे मेसेज कधीही लिहणार नाहीत. तो खऱ्या अर्थानं सनकी आहे. तो या प्रकारचे मेसेज करु शकतो यावर माझा विश्वासही बसत नव्हता.'

जेव्हा महिला क्रिकेटर Sarah Taylorने केले होते 'न्यूड' फोटोशुट

शेन वॉर्न हा क्रिकेटच्या इतिहासातील महान बॉलरपैकी एक आहे. त्यानं 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 145 टेस्ट आणि 194 वन-डेमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं. तो टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा दुसरा बॉलर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 708 विकेट्स घेणाऱ्या शेन वॉर्ननं शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच 2007 साली खेळली होती.

First published:
top videos

    Tags: Australia, Cricket news