मुंबई, 5 नोव्हेंबर: तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर त्याचा मोठा फटका तेथील क्रिकेटला (Afghanistan Cricket) बसला आहे. टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) अफगाणिस्तानच्या सहभाग अनिश्चित होता. या अनिश्चिततेवर मात करत अफगाणिस्तानची टीम टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यास उतरली. या स्पर्धेत त्यांनी चांगली कामगिरी करत क्रिकेट विश्वाला प्रभावित केलं आहे. पण, तालिबानी राजवटीमुळे त्यांचं होत असलेलं नुकसान क्रिकेट टीमला टाळता आलेलं नाही.
तालिबाननी सत्तेवर येताच महिलांना क्रिकेटसह (Women’s Cricket Afghanistan) कोणताही खेळ खेळायला मिळणार नाही, अशी घोषणा केली होती. तालिबानच्या या निर्णयानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं येत्या 27 नोव्हेंबर रोजी होबार्टमध्ये होणारी टेस्ट पुढे ढकलली आहे. दोन्ही देशांमध्ये होणारी ही पहिलीच टेस्ट होती. 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'नं ट्विट करत ही माहिती दिली आहे.
'आम्ही 2021-22 मधील वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार अफगाणिस्तानच्या पुरुष टीमबरोबर होणारी टेस्ट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही या बिग बॅश लीगच्या सिझनमध्ये अफगाणिस्तानचे खेळाडू तसंच भविष्यात दोन्ही अफगाणिस्तान टीमचे यजमानपद भूषवण्यास उत्सुक आहोत,' असं ट्विट क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (Cricket Australia) केलं आहे.
We've confirmed updates to the '21-22 schedule, including postponement of the scheduled men's Test against Afghanistan.
We look forward to hosting Afghanistan players in the BBL this season, as well as both Afghanistan teams in the future. Full update: https://t.co/EsGNREfGdc pic.twitter.com/vSOC6sAxn2 — Cricket Australia (@CricketAus) November 5, 2021
अफगाणिस्तानच्या महिला टीमवर क्रिकेट खेळण्यासाठी बंदी आल्यानं, त्यांच्या पुरुष टीमचा टेस्ट टीमचा दर्जाही धोक्यात आला आहे. आयसीसीच्या नियमांनुसार ज्या देशाच्या महिला आणि पुरुष टीम खेळतात त्यांनाच टेस्ट टीमचा दर्जा देण्यात येतो. महिला टीममध्ये 12 सदस्य असणं गरजेचं असतं आणि अफगाणिस्तानने 2017 साली ही अट पूर्ण केली. मागच्याच वर्षी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने 25 महिला क्रिकेटपटूंना करारबद्धही केलं होतं. पण तालिबानी राजवटीमुळे त्यांच्या क्रिकेटला धोका निर्माण झाला आहे.
T20 World Cup: अफगाणिस्तानच्या मदतीला टीम इंडियाची धाव, अश्विननं दिली मोठी ऑफर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Australia, Taliban