• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : चौथी टेस्ट हरल्यानंतरही भारत WTC फायनलमध्ये जाणार, कसं ते वाचा

IND vs ENG : चौथी टेस्ट हरल्यानंतरही भारत WTC फायनलमध्ये जाणार, कसं ते वाचा

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध आयसीसी (ICC) कडे तक्रार केली आहे. या तक्रारीचा फायदा भारताला होण्याची शक्यता आहे.

 • Share this:
  मुंबई, 3 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चार टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारत सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये भारताकडून पराभूत झाल्यानंतर इंग्लंडचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC) मधील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये भारताला चौथी टेस्ट किमान ड्रॉ करणं आवश्यक आहे. भारत चौथ्या टेस्टमध्ये पराभूत झाल्यास त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला होईल आणि ऑस्ट्रेलिया WTC फायनलमध्ये जाईल. भारताला होणार फायदा दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध आयसीसी (ICC) कडे तक्रार केली आहे. या तक्रारीचा फायदा भारताला होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन टीमनं कोरोनाचं कारण देत दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील तीन टेस्ट मॅचची सीरिज होऊ शकली नाही. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने याबाबत ऑस्ट्रेलियाकडे तक्रार केली आहे. हा दौरा रद्द करण्याची शिक्षा म्हणून ऑस्ट्रेलियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील पाँईट्स कमी करावे अशी मागणी दक्षिण आफ्रिकेनं केली आहे. ‘सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड’ या ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रानं हे वृत्त दिलं आहे. आयसीसीनं दक्षिण आफ्रिकेची मागणी मान्य करत ऑस्ट्रेलियाचे पॉईंट्स कमी केले, तर भारत चौथी टेस्ट हरल्यानंतरही फायनलमध्ये जाऊ शकेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (CA) हा वाद परस्पर सामंजस्यानं सोडवण्याची संधी आहे. मात्र यासाठी त्यांना आयसीसीच्या तडजोड समितीकडे अपिल करावं लागेल. हे अपिल करण्यासाठी आता फक्त हाच आठवडा शिल्लक आहे. ऑस्ट्रेलियाने या आठवड्यात अपिल केलं नाही तर, आयसीसीला या प्रकरणावर स्वतंत्र समिती नेमावी लागेल. आयसीसीची संभाव्य समिती हा दौरा रद्द केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला निर्धारित 120 पॉईंट्स बहाल करु शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया फायनलपूर्वीच स्पर्धेतून आऊट होईल. दुसरा पर्याय म्हणजे दोन्ही देशांना आयसीसचं नियोजीत वेळापत्रक संपण्यापूर्वी म्हणजे एप्रिल 2023 पूर्वी ही सीरिज खेळावी लागेल. मात्र दोन्ही टीमचं व्यस्त वेळापत्रक पाहता ही शक्यता कमी आहे. ( वाचा : IPL 2021 पूर्वी ग्लेन मॅक्सवेलचा धमाका, एकाच ओव्हरमध्ये लगावले 4 6 4 4 4 6 ! ) इंग्लंडमधील लॉर्ड्सवर होणाऱ्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं यापूर्वीच प्रवेश केला आहे. दुसऱ्या जागेसाठी सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियात चुरस आहे.
  Published by:News18 Desk
  First published: