मुंबई, 13 ऑक्टोबर: संपूर्ण क्रिकेट विश्वाला आता टी20 वर्ल्ड कपचे वेध लागले आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियात अॅशेस सीरिजची (Ashes Series 2021) चर्चा सुरू झाली आहे. या सीरिजसाठी इंग्लंडनं त्यांच्या टीमची घोषणा केली आहे. आता यजमान ऑस्ट्रेलियाच्या टीमची सर्वांना प्रतीक्षा आहे. टीम इंडियाविरुद्ध सीरिज गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया या वर्षात पहिल्यांदाच टेस्ट मॅच खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा बॅटर ट्रेविस हेडनं (Travis Head) अॅशेस सीरिजपूर्वी द्विशतक झळकावत टीममधील दावेदारी सादर केली आहे. त्यानं मार्श कप या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत 127 बॉलमध्ये 230 रनची खेळी केली. साऊथ ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन असलेल्या हेडनं क्विन्सलँड विरुद्ध ही कामगिरी केली. मॅचच्या चौथ्या ओव्हरला आलेल्या हेडनं 45 व्या ओव्हरमध्ये द्विशतक पूर्ण केले.
हेडनं हे द्विशतक फक्त 114 बॉलमध्ये झळकावले. त्यापूर्वी शतक पूर्ण करण्यासाठी त्यानं फक्त 65 बॉल घेतले. या खेळीनंतर वन-डेमध्ये दोन द्विशतक करणारा हेड हा पहिला ऑस्ट्रेलियन बनला आहे. हेडच्या या शतकामुळे साऊथ ऑस्ट्रेलियानं पावसाचा अडथळा आलेल्या या मॅचमध्ये क्विन्सलँड विरुद्ध 8 आऊट 391 रन केले.
हेड 127 बॉलमध्ये 230 रन काढून आऊट झाला. या खेळीत त्यानं 28 फोर आणि 8 सिक्स लगावले. याचा अर्थ त्यानं फक्त 36 बॉलमध्येच 160 रन काढले. ऑस्ट्रेलियातील मार्श कप स्पर्धेच्या इतिहासातील हा दुसऱ्या क्रमांकाचा वैयक्तिक स्कोअर आहे. यापूर्वी 2018 साली क्विन्सलँड विरुद्धच डर्सी शॉर्टनं 237 रनची खेळी केली होती.
भारताविरुद्ध केले होते ड्रॉप
हेडला मागील वर्षी भारताविरुद्ध झालेल्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये दुसऱ्या टेस्टनंतर ड्रॉप केले होते. त्यानं मागील महिन्यात शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत 163 रनची खेळी करत सिझनची जोरदार सुरुवात केली होती. या खेळीनंतर ऑस्ट्रेलियन टीमचा हेड कोच जस्टीन लँगरनं त्याच्याशी फोनवरुन चर्चा केली. कोरोनामुळे ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत क्रिकेटच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.पण, त्याचा हेडवर काहीही परिणाम झाला नाही. त्यानं मैदानात परत येताच द्विशतक झळकावले.
IPL 2021 गाजवणारा आणखी एक खेळाडू T20 वर्ल्ड कप खेळणार! BCCI चा आदेश मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.