क्रिकेट इतिहासातला सर्वात मोठा निर्णय, ‘हा’ संघ देणार तृतीयपंथीयांना संघात जागा!

क्रिकेट इतिहासातला सर्वात मोठा निर्णय, ‘हा’ संघ देणार तृतीयपंथीयांना संघात जागा!

तृतीयपंथीयांना महिला क्रिकेट संघात सामिल होण्यासाठी टेस्टोस्टेरोन ही टेस्ट द्यावी लागणार आहे.

  • Share this:

सिडन, 08 ऑगस्ट : क्रिकेटमध्ये आतापर्यंत पुरुष आणि महिला संघ अशा संघांमध्ये सामने होत असतं. मात्र आता जगभरात तृतीय पंथांना मिळणाऱ्या संधी आणि मान पाहता क्रिकेटमध्येही एक मोठा बदल करण्यात आला आहे. गुरुवारी ऑस्ट्रेलिया बोर्डानं नवे नियम जाहीर केले. यात आता तृतीयपंथीयांना क्रिकेट संघात जागा मिळणार आहे. दरम्यान, तृतीयपंथीयांना महिला क्रिकेट संघात सामिल होण्यासाठी टेस्टोस्टेरोन ही टेस्ट द्यावी लागणार आहे.

नियमांनुसार, देशातील मोठ्या संघांकडून खेळण्याआधी स्वत:ला सिध्द करावे लागणार आहे. यासाठी टेस्टोस्टेरोन ही टेस्टही ग्राह्य ठरली जाणार आहे. यासाठी 10 नैनोमोल्स पर लिटर कमी असणे महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलिया बोर्डाचा हा नियम कम्युनिटी क्लबसाठी ही लागू होणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचे दिग्गज आणि न्यू साऊथ वेल्स बोर्डानं या निर्णयाचे स्वागत केले आहे. क्रिकेट.कॉम.एयूशी बोलताना, 'ऑस्ट्रेलिया क्रिकेटनं घेतलेला हा निर्णय स्वागतास्पद आहे. ज्या देशात क्रिकेटला खुप महत्त्व दिले जाते, त्या देशात असे निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. हा खेळ सर्वांसाठी आहे, हे यामुळं सिध्द होते”, असे न्यू साऊथ वेल्स बोर्डानं सांगितले.

वाचा-‘पैसे नाही घेत पण...’, BCCIच्या अधिकाऱ्याचे द्रविडवर गंभीर आरोप

क्रिकेट हा खेळ सर्व जाती, लिंगा पलीकडचा

न्यू साऊथ वेल्स बोर्डानं दिलेल्या माहितीत, “हा खेळ सर्वांसाठी आहे. आम्हाला ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचा अभिमान आहे. ट्रांसजेंडर डाइवर्स पॉलिसी खुप महत्त्वाची आहे. या निर्णय अंमलात आणण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पण आनंद होत आहे की, असा धाडसी निर्णय घेतला गेला”, असे सांगितले.

वाचा- भारताचा ‘ब्रॅण्ड सिंधू’ जगात भारी! कमाई वाचून व्हाल थक्क

आईने प्राण सोडले पण लेकरू सोडलं नाही, काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2019 08:19 PM IST

ताज्या बातम्या