भारताविरुद्धच्या पराभवाचा फटका, ऑस्ट्रेलियाचा या खेळाडूंना करारातून डच्चू

भारताविरुद्धच्या पराभवाचा फटका, ऑस्ट्रेलियाचा या खेळाडूंना करारातून डच्चू

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) त्यांच्या खेळाडूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. भारताविरुद्ध झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर (India vs Australia) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काही खेळाडूंना करारातून डच्चू दिला आहे.

  • Share this:

मेलबर्न, 23 एप्रिल : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) त्यांच्या खेळाडूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. भारताविरुद्ध झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर (India vs Australia) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काही खेळाडूंना करारातून डच्चू दिला आहे. मॅथ्यू वेड, ट्रॅव्हिस हेड, जो बर्न्स, मिचेल मार्श आणि मार्कस स्टॉयनीस यांच्यासोबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने करार केला नाही. ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन याच्यासोबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच करार केला आहे. ग्रीनने भारताविरुद्धच्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 33.71 च्या सरासरीने 236 रन केले. क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबतच्या करारात मागच्या मोसमात 20 खेळाडू होते, यंदा मात्र ही संख्या 17 करण्यात आली आहे.

भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर टेस्ट टीमचा कर्णधार टीम पेन याच्यावर जोरदार टीका झाली होती, तसंच त्याची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्याची मागणीही ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांनी आणि काही माजी क्रिकेटपटूंनी केली होती, पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टीम पेनसोबतचा करार कायम ठेवला आहे.

या वर्षी ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळणार आहे, तसंच घरच्या मैदानात ऍशेस सीरिजही होणार आहे. ऑस्ट्रेलियाने माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचाही करारबद्ध खेळाडूंमध्ये समावेश केला आहे.

'ज्या 17 खेळाडूंची आम्ही घोषणा केली, त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ऑस्ट्रेलिया टीम या मोसमात खूप क्रिकेट खेळणार आहे,' असं निवड समितीचे सदस्य ट्रॅव्हर हॉन्स म्हणाले.

ऑस्ट्रेलियाने करारबद्ध केलेले 17 खेळाडू

एश्टन एगर, एलेक्स केरी, पॅट कमिन्स, एरॉन फिंच, कॅमरन ग्रीन, जॉश हेजलवूड, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, ग्लेन मॅक्सवेल, टिम पेन, जेम्स पॅटन्सन, जेनी रिचर्डसन, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, डेविड वॉर्नर, एडम झम्पा

Published by: Shreyas
First published: April 23, 2021, 4:49 PM IST

ताज्या बातम्या