Home /News /sport /

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सीरिज तिसऱ्यांदा स्थगित, यंदा किवी टीम ठरली कारण

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सीरिज तिसऱ्यांदा स्थगित, यंदा किवी टीम ठरली कारण

अ‍ॅशेस सीरिज जिंकून फॉर्मात असलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमसाठी निराशाजनक बातमी आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यातील मालिका पुन्हा एकदा स्थगित झाली आहे.

    मुंबई, 19 जानेवारी : अ‍ॅशेस सीरिज जिंकून फॉर्मात असलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमसाठी निराशाजनक बातमी आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यातील मालिका पुन्हा एकदा स्थगित झाली आहे. न्यूझीलंड क्रिकेट टीम या महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार (New Zeland vs Australia) होती. 30 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान होणारी ही लिमिटेड ओव्हर्सची मालिका आजवर तिसऱ्यांदा स्थगित झाली आहे. त्यामुळे 44 वर्षात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये उन्हाळ्यात कोणतीही लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटची मालिका होणार नाही. न्यूझीलंड टीम ठरली कारण कोरोना व्हायरसमुळे ही मालिका यापूर्वी दोन वेळा स्थगित करण्यात आली होती. यंदा न्यूझीलंड टीममुळे स्थगित झाली आहे. न्यूझीलंडच्या क्रिकेट टीमने फेब्रुवारी महिन्यातील क्वारंटाईन जागेचे बुकिंग केलेले नाही. कारण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परतल्यानंतर त्याची गरज भासेल असे त्यांच्या क्रिकेट बोर्डाला वाटले नव्हते. यापूर्वी जानेवारी महिन्याच्या पहिल्या हाफ पर्यंतच हे बुकिंग करणे आवश्यक होते. पण, ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे ही मर्यादा  फेब्रुवारी अखेरपर्यंत वाढवण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा दौरा होईल अशी आशा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियासोबत नव्या पर्यायावरही चर्चा करण्यात आली, पण त्यावर तोडगा न निघाल्यानं अखेर ही मालिका स्थगित करण्यात आली आहे.यापूर्वी कोरोनाच्या नियमामुळेच न्यूझीलंडने अंडर 19 वर्ल्ड कपमधून माघार घेतली आहे. त्याच्या जागेवर स्कॉटलंडची टीम ही स्पर्धा खेळत आहे. अख्तरच्या बॉलिंगवर पुन्हा दिसणार सेहवागचे सिक्स, दिग्गज खेळाडू आमने-सामने न्यूझीलंडचा दिग्गज बॅटर रॉस टेलर या मालिकेनंतर लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधून निवृत्त होणार होता. आता त्याची निवृत्ती लांबणीवर पडणार आहे. न्यूझीलंडची टीम यानंतर नेदरलँड विरुद्ध मालिका खेळणार आहे. त्या मालिकेत आता रॉस टेलर निवृत्त होण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Cricket news, New zealand

    पुढील बातम्या