IND vs AUS : कोरोनाचं वाढतं संकट, ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना सिडनीला असं पोहोचवलं

IND vs AUS : कोरोनाचं वाढतं संकट, ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना सिडनीला असं पोहोचवलं

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टीम (Team India) सिडनीमध्ये दाखल झाली आहे. या दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

  • Share this:

सिडनी, 17 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टीम (Team India) सिडनीमध्ये दाखल झाली आहे. या दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. 27 नोव्हेंबरला वनडे सीरिजपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. वनडेनंतर टी-20 सीरिज आणि मग 17 डिसेंबरपासून दोन्ही टीममध्ये टेस्ट सीरिजला सुरुवात होईल. ऍडलेडमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया डे-नाईट टेस्ट मॅच खेळतील. पण या मॅचवर आता संकट ओढावलं आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑस्ट्रेलियातल्या अनेक राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. भारताविरुद्धची महत्त्वाची सीरिज वाचवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया प्रयत्न करत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा टेस्ट कर्णधार टीम पेन, मॅथ्यू वेड, मार्नस लाबुशेन, ट्रेव्हिस हेड, कॅमरुन ग्रीन यांच्यासह ऑस्ट्रेलियाच्या ए टीमच्या खेळाडूंना एयरलिफ्ट करुन सिडनीमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे.

आर्थिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न

पश्चिम ऑस्ट्रेलिया, क्वीन्सलॅन्ड आणि टास्मानिया यांनी सोमवारी दक्षिण ऑस्ट्रेलियासोबत असलेल्या त्यांच्या सीमा बंद केल्या. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आर्थिक नुकसान टाळण्यासाठी मंगळवारी ऑस्ट्रेलियाची वनडे, टी-20 टीम, टेस्ट टीम आणि ऑस्ट्रेलिया ए टीमला सिडनीला आणण्याचा प्रयत्न करत होतं. त्यामुळे अखेर खेळाडूंना चार्टर्ड विमानाने सिडनीला पाठवण्यात आलं. सीरिजचं आयोजन सुरक्षितपणे व्हावं, यासाठी सगळे संभाव्य उपाय केले जातील, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलं.

आम्ही जैव सुरक्षितता आणि टीमच्या स्थितीवर नजर ठेवून आहोत. खेळाडू, प्रशिक्षक आणि सहयोगी टीमच्या सदस्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी काम केलं जात आहे. सीरिजचं आयोजन सुरक्षित व्हावं, यासाठी संभाव्य अशा सगळ्या गोष्टी आणि उपाय योजिले जातील, असं स्पष्टीकरण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलं आहे.

Published by: Shreyas
First published: November 17, 2020, 7:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading