Home /News /sport /

Cricket News: ऑस्ट्रेलियात पुन्हा बॉल टॅम्परिंगचं भूत, या खेळाडूच्या चौकशीला सुरुवात

Cricket News: ऑस्ट्रेलियात पुन्हा बॉल टॅम्परिंगचं भूत, या खेळाडूच्या चौकशीला सुरुवात

Ball Tempering: बॉल टॅम्परिंगबाबत नवी माहिती समोर आली तर आम्ही पुन्हा एकदा चौकशी करू, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मागच्याच आठवड्यात सांगितलं होतं.

  मुंबई, 17 मे : ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये (Cricket Australia) बॉल टॅम्परिंगच्या वादाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. तीन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या बॉल टॅम्परिंगप्रकरणी (Ball Tampering) कॅमरन बॅन्क्रॉफ्टच्या (Cameron Bancroft) अडचणी वाढू शकतात. टीममधल्या कमीत कमी तीन जणांना याची कल्पना होती, असं बॅन्क्रॉफ्ट एका मुलाखतीमध्ये म्हणाला, यानंतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाची इंटिग्रिटी युनिट त्याची चौकशी करणार आहे. या वादाबाबत आणखी माहिती मिळावी, यासाठी ही चौकशी केली जाणार आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इंटिग्रिटी युनिटने बॅन्क्रॉफ्टला काही प्रश्न विचारले आहेत, या प्रश्नांच्या उत्तराची इंटिग्रिटी युनिट वाट पाहत आहे. बॅन्क्रॉफ्ट सध्या काऊंटी क्रिकेट खेळत आहे. बॅन्क्रॉफ्टने द गार्डियन या वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला बॉलर्सना बॉल टॅम्परिंगबाबत माहिती होतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा झालेल्या गोष्टीबद्दल मीच जबाबदार आहे, पण बहुतेक बॉलर्सना याबाबत माहिती होती, असं उत्तर बॅन्क्रॉफ्टने दिलं.

  क्रिकेटमध्ये नवं चक्रीवादळ, वॉनच्या 'मॅच फिक्सर' वक्तव्यावर सलमान बटचा पलटवार

   'मी मैदानात जे काही केलं, त्याला मीच जबाबदार आहे. मी जे केलं त्यामुळे बॉलर्सना फायदा झाला. याबाबत कोणालाही जागरुक करण्याची गरज नव्हती, कारण सगळ्यांना माहिती होतं, की मी काय करत आहे. मला वाटतं याबाबत बॉलर्सना माहिती होतं,' अशी प्रतिक्रिया बॅन्क्रॉफ्टने दिली. IPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO बॉल टॅम्परिंगबाबत नवी माहिती समोर आली तर आम्ही पुन्हा एकदा चौकशी करू, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मागच्याच आठवड्यात सांगितलं होतं. 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केप टाऊन टेस्टमध्ये बॅनक्रॉफ्टने बॉलला सॅण्ड पेपर (Sand Paper) लावून बॉल रगडला. ही दृष्यं कॅमेरामध्ये कैद झाल्यानंतर क्रिकेट विश्वात मोठा वाद निर्माण झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत कडक पावलं उचलत स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांचं एका वर्षासाठी तसंच बॅन्क्रॉफ्टचं 9 महिन्यांसाठी निलंबन केलं होतं.
  First published:

  Tags: Cricket news

  पुढील बातम्या