मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम पेननंतर त्याच्या दाजीवरही त्याच महिलेला अश्लिल मेसेज, फोटो पाठवल्याचा आरोप

टीम पेननंतर त्याच्या दाजीवरही त्याच महिलेला अश्लिल मेसेज, फोटो पाठवल्याचा आरोप

Tasmanian Shield cricketer Shannon Tubb

Tasmanian Shield cricketer Shannon Tubb

टीम पेनवर एका मुलीला अश्लिल मेसेज आणि फोटो पाठवल्याचा आरोप आहे. आता हाच आरोप त्याच्या बहिणीच्या नवऱ्यावरही करण्यात (Tim Paine’s brother-in-law)आला आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) याने एशेस सीरिजआधी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. टीम पेनवर एका मुलीला अश्लिल मेसेज आणि फोटो पाठवल्याचा आरोप आहे. आता हाच आरोप त्याच्या बहिणीच्या नवऱ्यावरही करण्यात (Tim Paine’s brother-in-law forced out of Cricket Tas over sexting probe with same woman)आला आहे.

पेनने ज्या महिलेला अश्लिल मेसेज, फोटो पाठवले त्याच महिलेला पेनच्या बहिणीचा पती शॅनन टब यानेही पाठवले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या ‘सेक्सटिंग’ वादामुळे क्रिकेट तस्मानियाने शॅननला बडतर्फ केले आहे. 41 वर्षीय शॅननने तस्मानियासाठी शेफील्ड शील्ड क्रिकेट स्पर्धा खेळली आहे आणि प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, महिला सहकाऱ्याला अश्लील संदेश पाठवल्याच्या आरोपांची चौकशी सुरू झाल्यानंतर टिम पेनचा दाजी म्हणजेच बहिणीचा नवरा शॅननने कोचिंग पद सोडले आहे. ही तीच महिला सहकारी आहे जिला पेनने 2017 मध्ये अश्लील संदेश पाठवले होते. क्रिकेट तस्मानियाने शॅननच्या आरोपांचीही चौकशी केली.

त्याचवेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पेनवरील आरोपांची चौकशीही केली. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने पेनला क्लीन चिट दिली होती. मात्र, चार वर्षांनंतर पेनचा अश्लील संदेश व्हायरल झाल्याने त्याला कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला.

शॅननचे लग्न पेनच्या बहिणीशी झाले आहे. ४१ वर्षीय डावखुरा फिरकीपटू शॅनन ९०च्या दशकात तस्मानियाकडून क्रिकेट खेळला आहे. मात्र, या वादानंतर तो अॅडलेडच्या प्रिन्स अल्फ्रेड कॉलेजच्या संघाचा प्रशिक्षक बनला आहे.

पेनने शुक्रवारी होबार्टचे कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली. स्टीव्ह स्मिथ बॉल टॅम्परिंगच्या वादात दोषी आढळल्यानंतर पेनला 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते.

First published: