• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • डेव्हिड वॉर्नरचा मालदीवच्या बारमध्ये माजी क्रिकेटपटूसोबत राडा?

डेव्हिड वॉर्नरचा मालदीवच्या बारमध्ये माजी क्रिकेटपटूसोबत राडा?

आयपीएल स्पर्धा (IPL 2021) अचानक स्थगित झाल्यानं स्पर्धेत सहभागी असलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू, कोचिंग स्टाफ आणि समालोचक सध्या मालदीवमध्ये आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या येथील वास्तव्याला गालबोट लागल्याचं वृत्त आहे

 • Share this:
  मालदीव, 9 मे : आयपीएल स्पर्धा (IPL 2021) अचानक स्थगित झाल्यानं स्पर्धेत सहभागी असलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू, कोचिंग स्टाफ आणि समालोचक  सध्या मालदीवमध्ये आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारनं घातलेल्या बंदीचा कालावधी पूर्ण होईपर्यंत हे सर्वजण मालदिवमध्ये थांबणार आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या येथील वास्तव्याला गालबोट लागल्याचं वृत्त आहे. ऑस्ट्रेलिया आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) ओपनर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि ऑस्ट्रेलियाचा माजी  क्रिकेटपटू समालोचक मायकल स्लॅटर (Michael Slater) यांच्यात मालदीवच्या बारमध्ये राडा झाल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. डेव्हिड वॉर्नर आयपीएल स्पर्धा सुरु झाली तेव्हा सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन होता. त्यानंतर हैदरबादच्या खराब कामगिरीमुळे त्याच्याकडून कॅप्टनसी काढून घेण्यात आली. तसेच वॉर्नरची टीममधील जागा देखील गेली. मायकल स्लॅटर हा आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत होता. भारतामध्ये कोरोनाची संख्या वाढल्यानंतर तो स्पर्धा स्थगित होण्यापूर्वीच मालदीवला निघून गेला. सध्या हे दोघंही मालदीवमधील एकाच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहेत. 'संडे टेलीग्राफ' नं दिलेल्या वृत्तानुसार वॉर्नर आणि स्लॅटरमध्ये जोरदार शाब्दिक संघर्ष झाला तसंच शारीरिक बाचाबाची देखील झाली. या दोन्ही खेळाडूंनी मात्र या प्रकराची कोणतीही घटना झालीच नाही, असा दावा 'डेली मेल' शी बोलताना केला आहे. 'मी आणि वॉर्नर हे दोघंही चांगले मित्र आहोत. आमच्यामध्ये भांडणाची शक्यता शून्य आहे. याबाबतच्या सर्व चर्चा निराधार आहेत," असा दावा स्लॅटरनं केला आहे. तर या प्रकारची बातमी तुम्हाला कुठून समजली हे मला माहिती नाही. या पद्धतीची बातमी देण्यासाठी  घटनास्थळी उपस्थित राहणे किंवा तुमच्याकडे भक्कम पुरावा असणे आवश्यक आहे," असं सांगत वॉर्नरनं देखील भांडण झाल्याचं वृत्त फेटाळलं आहे. ...त्यावेळी खूप त्रास झाला, चेतेश्वर पुजाराने सांगितलं 'दु:ख' डेव्हिड वॉर्नर आणि मायकल स्लॅटर यांच्यासह आयपीएलशी संबंधित असलेले 38 जण सध्या मालदीवमध्ये आहेत. हे सर्व जण 15 मे नंतर मायदेशी रवाना होतील.
  Published by:News18 Desk
  First published: