Home /News /sport /

AUS vs SL : क्रिकेटच्या मैदानात मोठी दुर्घटना, ऑस्ट्रेलिया टीम मैदानात येताच स्टँड कोसळले, VIDEO

AUS vs SL : क्रिकेटच्या मैदानात मोठी दुर्घटना, ऑस्ट्रेलिया टीम मैदानात येताच स्टँड कोसळले, VIDEO

श्रीलंका विरद्ध ऑस्ट्रेलिया (SL vs AUS) यांच्यात गॉलमध्ये पहिली टेस्ट सुरू आहे. ऑस्ट्रेलियन टीम मैदानात दाखल होताच काही वेळानं झालेल्या या घटनेनं सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.

    मुंबई, 30 जून : श्रीलंका विरद्ध ऑस्ट्रेलिया (SL vs AUS) यांच्यात गॉलमध्ये पहिली टेस्ट सुरू आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी व्यवस्थित खेळ झाला. पण, दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वीच पाऊस आणि वादळानं अडथळा निर्माण केला. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ वेळेत सुरू झाला नाही. त्याचबरोबर एक स्टँड देखील कोसळून पडले. ऑस्ट्रेलियन टीम मैदानात दाखल होताच काही वेळानं झालेल्या या घटनेनं सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. गॉलच्या मैदानातील हे तात्पुरते उभारण्यात आलेले स्टँड होते. सुदैवाची बाब म्हणजे हा अपघात झाला त्यावेळी तिथं कोणताही प्रेक्षक नव्हता. त्यामुळे या अपघातामध्ये कुणीही जखमी झाले नाही. दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी जवळपास 90 मिनिटे मुसळधार पाऊस झाला. यावेळी वारा देखील वेगानं सुटला होता. त्यामुळे हे स्टँड कोसळले. पावसामुळे ग्राऊंड स्टाफनं सर्व पिच झाकलं, पण मैदानातील काही भागात दोरीनं कव्हर अंथरण्यात आले होते. ते कव्हर वाऱ्यानं उडाले. पाऊस आणि वादळामध्ये संपूर्ण मैदान झाकण्यासाठी ग्राऊंड स्टाफला चांगलाच संघर्ष करावा लागला. गॉल टेस्टच्या पहिल्या दिवशी 13 विकेट्स पडल्या आहेत. त्यामुळे ही टेस्ट निकाली लागण्याची पूर्ण शक्यता आहे. यजनान श्रीलंकेची पहिली इनिंग 212 रनवर संपुष्टात आली. निशान डिकवेलानं सातव्या नंबरवर बॅटींगला येत झुंजार 58 रनची खेळी केली. एंजलो मॅथ्यूजनं 39 रन काढले. ऑस्ट्रेलियाकडून ऑफ स्पिनर नॅथन लायन यांनी 90 रन देत 5 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्वेपसननंही 3 विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कला प्रत्येकी एक विकेट मिळाली. टीम इंडियाचा घाम काढणाऱ्या आयर्लंड क्रिकेट टीमला शापोरजी पालनोनजी यांनी दिली होती संजीवनी ऑस्ट्रेलियाची सुरूवात देखील चांगली झाली नाही. पहिल्या दिवशी त्यांनी तीन विकेट्स झटपट गमावल्या. डेव्हिड वॉर्नर (David Warner) 25 रनवर आऊट झाला. स्टीव्ह स्मिथ फक्त 6 रन काढून परतला तर लाबुशेनलाही 13 रन करता आले.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Australia, Cricket news, Live video, Sri lanka

    पुढील बातम्या