‘या’ कारणामुळे ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द! न्यूझीलंडला होणार फायदा

‘या’ कारणामुळे ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द! न्यूझीलंडला होणार फायदा

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (Cricket Australia) दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यात तीन टेस्ट मॅचची सीरिज सुरु होणार होती.

  • Share this:

सिडनी, 2 फेब्रुवारी : क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (Cricket Australia) दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यात तीन टेस्ट मॅचची सीरिज सुरु होणार होती. दक्षिण आफ्रिकेतील कोरना (Covid19) परिस्थितीमुळे  आमच्यासमोर हा दौरा रद्द करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, असं ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’नं स्पष्ट केलं आहे.

काय आहे कारण?

'सध्याच्या परिस्थितीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणे  हे खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसंच आमच्या अन्य सर्व सदस्यांसाठी धोकादायक  आहे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. या दौऱ्यासाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं (CSA) केलेल्या जय्यत तयारीची आम्हाला जाणीव आहे. यापुढील काळात ही सीरिज होण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया कटीबद्ध आहे. त्यासाठी अतिरिक्त परिश्रम घेण्याचीही आमची तयारी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं वेळापत्रक, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डासोबतचे आमचे संबंध आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धा पूर्ण करण्याची आमची इच्छा या गोष्टींचा विचार करता हा निर्णय घेणे अत्यंत अवघड होते,’ असं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्पष्ट केले आहे.

न्यूझीलंडला होणार फायदा!

ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केल्याचा फायदा आता त्यांचा शेजारी असलेल्या न्यूझीलंडला होणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (ICC World Test Championship) सध्या भारत 71.7 सरासरी पॉईंटसह पहिल्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडची टीम 70 पॉईंटसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाची टीम 69.2 पॉईंटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

(हे वाचा-IND vs ENG: टेस्ट सीरिजपूर्वी टीम इंडियाची पहिल्यांदाच प्रॅक्टिस, पाहा PHOTOS)

ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज जिंकली असती तर त्यांनी न्यूझीलंडला मागं टाकून टॉप 2 मध्ये धडक मारली असती. आता ते होण्याची शक्यता नाही. त्यामुळे न्यूझीलंडचं टॉप 2 मधील स्थान कायम राहणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 18 ते 22 जून दरम्यान लॉर्ड्सवर होणार आहे.

Published by: News18 Desk
First published: February 2, 2021, 4:22 PM IST

ताज्या बातम्या