मुंबई, 25 फेब्रुवारी : न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज मार्टिल गप्टिलला (Martin Guptill) नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात (IPL Auction 2021) कोणत्याही टीमनं खरेदी केले नव्हते. न्यूझीलंडच्या या अनुभवी खेळाडूनं हा सर्व राग ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सवर काढला. त्यानं दुसऱ्या टी-20 मध्ये फक्त 50 बॉलमध्ये 97 रन केले. याचबरोबर त्यानं आतंरराष्ट्रीय टी-20 मधील रोहित शर्माचा एक रेकॉर्डही मोडला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये गप्टीलनं 8 सिक्स लगावले. त्यामुळे गप्टील आता टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सिक्स लगावणारा खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर होता. गप्टीललं त्याला मागं टाकलं आहे. गप्टीलच्या नावावर आता 96 मॅचमध्ये 132 सिक्स आहेत. भारताच्या हिटमॅननं 108 मॅचमध्ये 127 सिक्स लगावले आहेत. विशेष म्हणजे अन्य कोणत्याही बॅट्समननं 120 पेक्षा जास्त सिक्स मारलेले नाहीत.
विराट, रोहितनंतर गप्टील
गप्टीलला यावेळी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील तिसरं शतक झळकावण्यात तीन रन कमी पडले. रोहित शर्मानं टी-20 क्रिकेटमध्ये चार शतक झळकाले आहेत. सर्वात जास्त रन करण्याच्या यादीमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या क्रमांकावर आहे. विराटनं 2928 रन केले आहेत. रोहित शर्मा 2773 रनसह दुसऱ्या तर गप्टील 2718 रनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
(हे वाचा : टीम इंडियातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉ ची डबल सेंच्युरी; 31 फोर, 5 सिक्सचा वर्षाव )
न्यूझीलंडनं या मॅचमध्ये 11 व्यांदा 200 पेक्षा जास्त रन केले. त्यापैकी 8 वेळा त्यांनी विजय मिळवला आहे. टी-20 मध्ये सर्वात जास्त वेळा 200 पेक्षा जास्त रन करण्याचा रेकॉर्ड टीम इंडियाच्या नावावर आहे. भारतानं 17 वेळा हा रेकॉर्ड केला आहे. त्यापैकी 15 मॅच आपण जिंकल्या आहेत.
न्यूझीलंडचा निसटता विजय
गप्टीलच्या खेळाच्या जोरावर न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियाचा 4 रननं निसटता पराभव केला. न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॅटींग करताना 9 आऊट 219 रन केले होते. ऑस्ट्रेलियानं 220 चं टार्गेट पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र त्यांना 8 आऊट 215 पर्यंत मजल मारता आली. आरसीबीनं (RCB) मोठ्या किंमतीमध्ये घेतलेला ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. मॅक्सवेल फक्त 3 रन काढून आऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉयनिसनं सर्वात जास्त 91 रन केले. पाच मॅचच्या या मालिकेत आता न्यूझीलंडकडं 2-0 अशी आघाडी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket, New zealand, Rohit sharma, Sports, Virat kohli