Home /News /sport /

Ashes Test: ब्रिस्बेन टेस्टच्या चौथ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा दमदार विजय, इंग्लंडचा मोठा पराभव करत सीरिजमध्ये आघाडी

Ashes Test: ब्रिस्बेन टेस्टच्या चौथ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा दमदार विजय, इंग्लंडचा मोठा पराभव करत सीरिजमध्ये आघाडी

अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंड चमत्कार करणार ही अपेक्षा करणाऱ्या सर्वांची सपशेल निराशा झाली आहे. ब्रिस्बेन टेस्टच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने इंग्लिश टीमला कोणतीही संधी दिली नाही.

    ब्रिस्बेन, 11 डिसेंबर : अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंड चमत्कार करणार ही अपेक्षा करणाऱ्या सर्वांची सपशेल निराशा झाली आहे. ब्रिस्बेन टेस्टच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने इंग्लिश टीमला कोणतीही संधी दिली नाही. त्यांनी इंग्लंडचा 9 विकेट्सनं मोठा पराभव करत या पाच टेस्टच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियानं चौथ्या दिवशी लंचनंतर काही वेळातच विजयावर शिक्कामोर्तब केले. एकाच सत्रात 8 विकेट्स इंग्लंडचा कॅप्टन जो रूट (Joe Root) आणि डेव्हिड मलान यांनी तिसऱ्या दिवशी 150 पेक्षा जास्त रनची भागिदारी केली होती. इंग्लिश टीमने 2 आऊट 220 या तिसऱ्या दिवसाच्या स्कोअरपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. तिसऱ्या दिवशी शेवटच्या सेशनमध्ये ऑस्ट्रेलियन बॉलर्स निष्प्रभ ठरले होते. त्यांनी चौथ्या दिवशी सकाळी जोरदार कमबॅक केले. ऑस्ट्रेलियन स्पिनर नॅथन लायननं (Nathan Lyon) डेव्हिड मलानला (Dawid Malan) आऊट करत इंग्लंडला शनिवारी पहिली धक्का दिला. लायननं टेस्ट क्रिकेटमधील 400 विकेट्स देखील यावेळी पूर्ण केल्या. त्यानंतर कॅमेरून ग्रीनने इंग्लंडला सर्वात मोठा धक्का दिला. हेजलवूडने कॅप्टन जो रूटला 89 रनवर आऊट केले. ऑस्ट्रेलियात पहिली टेस्ट सेंच्युरी करण्याची रूटची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. जो रूट आऊट झाल्यानंतर इंग्लंडची उर्वरित बॅटींग ऑर्डर झटपट कोसळली. बेन स्टोक्सनं (Ben Stokes) दुसऱ्या इनिंगमध्येही निराशा केली. तो 14 रन काढून आऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या इनिंगमध्ये नॅथन लायननं सर्वात जास्त 4 विकेट्स घेतल्या. कॅमेरून ग्रीन आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या. तर हेजलवूड आणि स्टार्कने प्रत्येकी 1 विकेट घेतली. इंग्लंडची दुसरी इनिंग 297 रनवर संपुष्टात आली. कॅप्टन रोहित शर्माची तयारी सुरू, दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वीचा VIDEO VIRAL ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 278 रनची आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांना विजयासाठी फक्त 20 रनचे टार्गेट होते. ऑस्ट्रेलियाने ते आव्हान विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत इंग्लंडचा मोठा पराभव केला. अ‍ॅलेक्स कॅरी 9 रन काढून आऊट झाला. रॉबिनसनने त्याला आऊट केले.  या सीरिजमधील दुसरी टेस्ट 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ashes, Australia, Cricket, England

    पुढील बातम्या