ब्रिस्बेन, 11 डिसेंबर : ऑस्ट्रेलियानं ब्रिस्बेन टेस्टच्या चौथ्याच दिवशी इंग्लंडचा (Australia vs England) 9 विकेट्सनं पराभव केला आहे. यजमान टीमनं या विजयासह पाच टेस्टच्या अॅशेस सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेडनं (Travis Head) पहिल्या इनिंगमध्ये आक्रमक शतक झळकावत 152 रन केले. त्याचबरोबर नॅथन लायननं (Nathan Lyon) टेस्ट क्रिकेटमध्ये 400 विकेट्सचा टप्पा देखील पूर्ण केला. ऑस्ट्रेलियानं सांघिक कामगिरी करत 2021 साली पहिली टेस्ट जिंकली. पण, त्यांच्या विजयाला मैदानाबाहेरील कारणांमुळे गालबोट लागले.
ब्रिस्बेन टेस्टच्या चौथ्या दिवशी गाबा स्टेडियममधील विद्यूत पुरवठा काही काळ बंद पडला होता. त्यामुळे अॅशेस सीरिज जगभरात होणारे प्रसारण काही काळ ब्रेक झाले होते. गाबा स्टेडियमच्या कंपाऊडमध्ये झालेल्या या प्रकाराचा जगभरातील क्रिकेट फॅन्सना फटका बसला. त्यांना या कालावधीत लाईव्ह पाहता आली नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करत या प्रकाराची माहिती दिली. पहिल्या टेस्टची कॉमेंट्री रेडिओवर ऐकावी असं आवाहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली.
.@CricketAus confirms there's a power issue at the Gabba affecting the broadcast around the world. Hopefully back ASAP! Tune in to the ABC radio feed in our match centre for commentary from the ground #Ashes
— cricket.com.au (@cricketcomau) December 11, 2021
ढिसाळ आयोजनामुळे गेली लाज
अॅशेस सीरिजला मोठा इतिहास असून जगभरातील फॅन्सचं या सीरिजकडे लक्ष असते. या सीरिजमधील पहिल्याच टेस्टमध्ये 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'ची ढिसाळ नियोजनामुळे जगासमोर लाज गेली आहे. ब्रिस्बेन टेस्टच्या दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सने (Ben Stokes) तब्बल 14 नो बॉल टाकले होते. पण, यापैकी 12 नो बॉल थर्ड अंपायरला दिसलेच नाहीत.
ऑस्ट्रेलियात अॅशेस सीरिजचे प्रसारण करणाऱ्या 'चॅनेल 7 ने केलेल्या गौप्यस्फोटानुसार बेन स्टोक्सनं गुरूवारी 14 वेळा नो बॉल टाकला असा गौप्यस्फोट केला आहे. त्यापैकी फक्त 2 वेळा थर्ड अंपायरने नो बॉल दिले. थर्ड अंपायरने असं का केलं याचं कारणही आता उघड झालं आहे. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर थर्ड अंपायरला नो बॉल देण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान नाही. त्यामुळे थर्ड अंपायरला प्रत्ये बॉलचा रिप्ले पाहणे शक्य नव्हते. त्यामुळे हा प्रकार घडला. त्यापाठोपाठ चौथ्या दिवशी जगभरातील प्रक्षेपण काही काळ बंद झाले होते. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ब्रिस्बेन टेस्टची तयारी व्यवस्थित केली नव्हती, हे सिद्ध झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashes, Australia, Cricket news, England