Home /News /sport /

Ashes Series : बेन स्टोक्सच्या ओव्हरमध्ये अंपायरकडून मोठी चूक, VIDEO पाहून बसणार नाही विश्वास!

Ashes Series : बेन स्टोक्सच्या ओव्हरमध्ये अंपायरकडून मोठी चूक, VIDEO पाहून बसणार नाही विश्वास!

ब्रिस्बेन टेस्टच्या दुसऱ्या दिवशी अंपायरने केलेली चूक हा मोठा चर्चेचा विषय बनली आहे. ऑस्ट्रेलियाच्या इनिंगमधील 13 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. इंग्लंडकडून बेन स्टोक्स (Ben Stokes) ही ओव्हर टाकत होता.

    ब्रिस्बेन, 9 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series)  पहिल्या टेस्टचा गुरुवारी दुसरा दिवस आहे. ब्रिस्बेनमध्ये सुरू असलेल्या या टेस्टमध्ये इंग्लंडची पहिली इनिंग 147 रनमध्ये संपुष्टात आली. त्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियानं एक विकेटच्या मोबदल्यातच इंग्लंडचा स्कोअर पार केला आहे. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मार्नस लबूशेन (Marnus Labuschange) यांनी अर्धशतक झळकावली आहेत.  ब्रिस्बेन टेस्टच्या दुसऱ्या दिवशी अंपायरने केलेली चूक हा मोठा चर्चेचा विषय बनली आहे. ऑस्ट्रेलियाच्या इनिंगमधील 13 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. इंग्लंडकडून बेन स्टोक्स (Ben Stokes) ही ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर स्टोक्सने वॉर्नरला क्लीन बोल्ड केले. पण तो बॉल नो बॉल असलल्याचा निर्णय थर्ड अंपायरनं दिला. स्टोक्सच्या या चुकीमुळे वॉर्नरला जीवदान मिळाले. वॉर्नर त्यावेळी फक्त 17 रनवर खेळत होता. बेन स्टोक्सनं या ओव्हरमध्ये वॉर्नरची दांडी उडवण्यापूर्वी तीन वेळा नो बॉल टाकला होता. पण, थर्ड अंपायरला ते लक्षात आले नाही. सध्याच्या क्रिकेटमध्ये बॉलरनं टाकलेला प्रत्येक बॉल योग्य आहे का? तो नो बॉल आहे की नाही? हे तपासण्याचं काम खर्ड अंपायरचं असतं. स्टोक्सनं त्या ओव्हरमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर नो बॉल टाकला. पण, थर्ड अंपायरनं फक्त चौथा बॉल तपासला. कारण, त्या बॉलवर वॉर्नर आऊट झाला होता. थर्ड अंपायरने यापूर्वीच म्हणजे ओव्हरच्या पहिल्या बॉललाच योग्य सूचना दिली असती तर स्टोक्सने ती चूक पुन्हा न करता वॉर्नरला योग्य बॉलवर आऊट केले असते. पण थर्ड अंपायर पॉल विल्सन यांना त्यांचे काम चोख बजावता आले नाही. थर्ड अंपायरने प्रत्येक बॉल तपासला पाहिजे, असं मत माजी अंपायर सायमन टॉफेल यांनी व्यक्त केले आह. ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंग यानेही या अंपायरिंगवर नाराजी व्यक्त केली आहे. विराट कोहलीची का झाली हकलपट्टी? भारतीय क्रिकेटचं भवितव्य ठरवणाऱ्या 48 तासांची Inside Story
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ashes, Australia, Ben stokes, England

    पुढील बातम्या