Home /News /sport /

Ashes Series: ऑस्ट्रेलियन बॉलरला 328 दिवसानंतर मिळाली पहिली विकेट, मोठ्या रेकॉर्डची नोंद

Ashes Series: ऑस्ट्रेलियन बॉलरला 328 दिवसानंतर मिळाली पहिली विकेट, मोठ्या रेकॉर्डची नोंद

अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series 2021) पहिल्या टेस्टवर ऑस्ट्रेलियानं मजबूत पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियन बॉलरचा मोठा रेकॉर्ड हे शनिवारच्या खेळाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

    ब्रिस्बेन, 11 डिसेंबर : अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series 2021) पहिल्या टेस्टवर ऑस्ट्रेलियानं मजबूत पकड मिळवली आहे. इंग्लंडच्या जो रूट (Joe Root) आणि डेव्हिड मलान (David Malan) या जोडीनं तिसऱ्या दिवशी 150 पेक्षा जास्त रनची नाबाद भागिदारी करत मॅचमध्ये रंगत निर्माण केली होती. चौथ्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलियन बॉलर्सनं झटपट विकेट्स घेत मॅचवरील पकड घट्ट केली आहे. ऑस्ट्रेलियन ऑफ स्पिन नॅथन लायनचा (Nathan Lyon) रेकॉर्ड हे शनिवारच्या खेळाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. लायननं टेस्ट क्रिकेटमधील 400 विकेट्स पूर्ण केले आहेत. शनिवारी सकाळी डेव्हिड मलानला झटपट आऊट करत लायननं हा रेकॉर्ड केला. लायननं तब्बल 328 दिवसांच्यानंतर टेस्ट क्रिकेटमधील विकेट घेतली. त्याने यापूर्वी  19 जानेवाारी रोजी भारताविरुद्ध 399 विकेट्स घेतल्या होत्या. ब्रिस्बेन टेस्टमध्ये इंग्लंडची पहिली इनिंग 147 रनवर संपुष्टात आली होती. त्या इनिंगमध्ये लायनला एकही विकेट मिळाली नव्हती. लायन टेस्ट क्रिकेटमध्ये 400 विकेट्स पूर्ण करणारा तिसरा ऑस्ट्रेलियन तर एकूण 17 वा बॉलर आहे. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात आजवर 10 फास्ट बॉलर तर 7 स्पिनर्सनी हा रेकॉर्ड केला आहे. लायन 400 विकेट्सचा टप्पा पार करणारा पहिलाच ऑस्ट्रेलियन ऑफ स्पिनर आहे. लायनपूर्वी  मुरलीधरन, हरभजन सिंग आणि आर. अश्विन यांनी ही कामगिरी केली आहे. मुरलीधरनच्या नावावर टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जास्त 800 विकेट्स आहेत. तर अश्विननं आजवर 427 विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडियाच्या स्टायलिश खेळाडूचा 'देसी लूक', Photo पाहून चाहते घायाळ! लायननं 400 विकेट्सचा टप्पा पार केल्यानंतर आणखी जोमाने बॉलिंग केली. त्याने ओली पोप आणि ओली रॉबिनसन यांना आऊट करत इंग्लंडला आणखी दोन धक्के दिले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील या सीरिजमध्ये एकूण 5 टेस्ट होणार आहेत. त्यामुळे लायनला या सीरिजमध्ये वासिम अक्रम (414) आणि हरभजन सिंग (417) या दिग्गजांना मागे टाकण्याची संधी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ashes, Australia, Cricket, England

    पुढील बातम्या