मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

AUS vs ENG, Ashes 1st Test : ऑस्ट्रेलियाच्या नंबर 1 बॉलरनं केली 127 वर्ष जुन्या रेकॉर्डची बरोबरी

AUS vs ENG, Ashes 1st Test : ऑस्ट्रेलियाच्या नंबर 1 बॉलरनं केली 127 वर्ष जुन्या रेकॉर्डची बरोबरी

ब्रिस्बेन टेस्टमध्ये टेस्टमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग घेण्याचा निर्णय इंग्लंडचा कॅप्टन जो रूटनं (Joe Root) घेतला होता. त्याच्या निर्णयावर ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्लनी पाणी ओतले.

  • Published by:  News18 Desk

ब्रिस्बेन, 8 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) पहिली टेस्ट ब्रिस्बेनमध्ये सुरू आहे. या टेस्टमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग घेण्याचा निर्णय इंग्लंडचा कॅप्टन जो रूटनं (Joe Root) घेतला होता. त्याच्या निर्णयावर ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्लनी पाणी ओतले. ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्स समोर इंग्लंडची संपूर्ण टीम 147 रनवर ऑल आऊट झाली.

ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन पॅट कमिन्सनं (Pat Cummins) सर्वात जास्त 5 विकेट्स घेतल्या. कॅप्टन म्हणून पदार्पणातील मॅचमध्ये 5 विकेट्स घेणारा कमिन्स हा दुसराच ऑस्ट्रेलियन आहे. याआधी 127 वर्षांपूर्वी जॉफ गिफन यांनी ही कामगिरी केली होती. त्यांनी 1894 साली इंग्लंड विरूद्ध 55 रन देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

इंग्लंडची पहिल्या दिवशी सकाळी सुरूवात धक्कादायक झाली. मिचेल स्टार्कनं मॅचच्या (Mitchell Starc) पहिल्याच बॉलवर बर्न्सला आऊट केले.  या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच डेव्हीड मलानला हेजलवूडने (Josh Hazelwood) आऊट केले. त्यानंतर हेजलवूडनेच इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्याने यावर्षी जबरदस्त फॉर्मात असलेला इंग्लंडचा कॅप्टन जो रूटला शून्यावर आऊट केले.

लंचनंतर जोस बटलरनं (Jos Buttler) प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याला स्टार्कने आऊट केले. इंग्लंडकडून बटलरनं सर्वात जास्त 39 रन काढले. तर ओली पोपने 35 रनची खेळी केली. ख्रिस वोक्सने नवव्या विकेटसाठी मार्क वूडसोबत 22 रनची भागिदारी केल्याने इंग्लंडला 140 चा टप्पा ओलांडता आला.

BAN vs PAK : पाकिस्तानच्या 'गब्बर' ने केली बांगलादेशची शिकार, टीम विजयाच्या मार्गावर

नंबर 1 बॉलर

पॅट कमिन्सनं आजवर 35 टेस्ट, 69 वन-डे आणि 37 टी20 इंटरनॅशनलमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर टेस्टमध्ये 169, वन-डेमध्ये 111 आणि टी20 इंटरनॅशनलमध्ये 42 विकेट्स आहेत. तो सध्या टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर 1 बॉलर आहे. ऑस्ट्रेलियाकडून रेमंड लिंडवाल (Raymond Lindwall) यांनी भारताविरुद्धच्या एकमेव टेस्टमध्ये कॅप्टनसी केली होती. त्यांच्यानंतर तो ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन झालेला पहिलाच फास्ट बॉलर आहे.

First published:

Tags: Ashes, Australia, Cricket, England