मुंबई, 11 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाने अॅशेस सीरिजची (Ashes Series) सुरूवात जोरदार केली आहे. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये यजमान टीमनं इंग्लंडचा (Australia vs England) 9 विकेट्सनं पराभव केला. इंग्लंडची दुसरी इनिंग चौथ्या दिवशी 297 रनवर संपुष्टात आली. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 20 रनचे माफक टार्गेट होते. ते त्यांनी एलेक्स कॅरीच्या मोबदल्यात पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये (WTC Point Table) मोठा बदल झाला आहे.
ऑस्ट्रेलियन टीमनं या विजयानंतर थेट दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तान या आशियाई टीमला मागे टाकले आहे. या पॉईट टेबलमध्ये श्रीलंका नंबर वनवर आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचे पर्सेंटेज पॉईंट्स समान आहेत. पण श्रीलंकेचे पॉईंट्स हे ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त आहेत. पाकिस्तानची टीम 75 पॉईंट्ससह तिसऱ्या तर टीम इंडिया 58.33 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर वेस्ट इंडिज, इंग्लड, न्यूझीलंड आणि बांगलादेश अशी क्रमवारी आहे.
Australia started their #WTC23 campaign with a win 💪#AUSvENG | #Ashes pic.twitter.com/fjxExBtYcP
— ICC (@ICC) December 11, 2021
ऑस्ट्रेलियन स्पिनर नॅथन लायननं (Nathan Lyon) डेव्हिड मलानला (Dawid Malan) आऊट करत इंग्लंडला शनिवारी पहिली धक्का दिला. लायननं टेस्ट क्रिकेटमधील 400 विकेट्स देखील यावेळी पूर्ण केल्या. या यशानंतर ऑस्ट्र्लियाने इंग्लंडला सातत्याने धक्के दिले.
शिखर धवन झाला मुलाच्या आठवणीने भावुक, Photo शेअर करत म्हणाला, बाळा...
ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या इनिंगमध्ये नॅथन लायननं सर्वात जास्त 4 विकेट्स घेतल्या. कॅमेरून ग्रीन आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या. तर हेजलवूड आणि स्टार्कने प्रत्येकी 1 विकेट घेतली. इंग्लंडची दुसरी इनिंग 297 रनवर संपुष्टात आली. या सीरिजमधील दुसरी टेस्ट 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket news, England, Team india