Asia Cup 2018: पाकिस्तानला हरवून बांग्लादेश फायनलमध्ये, शुक्रवारी होणार भारताशी टक्कर

Asia Cup 2018: पाकिस्तानला हरवून बांग्लादेश फायनलमध्ये, शुक्रवारी होणार भारताशी टक्कर

आशिया कप स्पर्धेच्या निर्णायक सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय.

  • Share this:

27 सप्टेंबर 2018: आशिया कप स्पर्धेच्या निर्णायक सामन्यात बांग्लादेशनं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय. 37 धावांनी पाकिस्तानला पराभूत करत बांग्लादेशनं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. मुशफिकूरची तडाखेबाज फलंदाजी आणि गोलंदाजांचा भेदक मारा याच्या बळावर बांग्लादेशनं पाकिस्तानला धूळ चारली. आता 28 सप्टेंबर रोजी भारत आणि बांग्लादेश यांच्यात आशिया कप स्पर्धेच्या विजेतेपदासाठी महामुकाबला रंगणार आहे.

बांग्लादेशच्या विजयामध्ये, त्यांच्या गोलंदाजांचं महत्त्वाचं योगदान होतं. जलदगती गोलंदाज मुस्तीफिजुर रहमानने 4 विकेट घेतले तर मेहदी हसनने 28 धावा करत 2 विकेट घेतले. पाकिस्तानसाठी इमाम उल हकने 83, आसिफ अलीने 31 आणि शोएब मलिकने 30 धावा केल्या. पण, पाकिस्तान संघाला अंतिम सामन्यात नेण्याची त्यांची मेहनत फुकट गेली.

याआधी मुश्फिकुर रहीमने 99 आणि मोहम्मद मिथुनने 60 हा संघर्षपूर्ण आकडा पार करत बांग्लादेशाने आशिया कप 2018च्या  सुपर 4 सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 240 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या दोन्ही संघामध्ये चौथ्या विकेटसाठी 144 धावांची भागीदारी होती. हे दोन फलंदाज सोडल्यास इतर फलंदाज धावा करायला सपशेल अपयशी ठरले.

यात इतर कोणत्याही गोलंदाज विकेट मिळवू शकला नाही आणि 48.5 षटकात संघाला 239 धावांवर संपली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत बांग्लादेश संघाने 12 धावांनी तीन बळी गमावले. सौम्य सरकार 0, मोमिनुल हक 5 आणि लिटोन दास 6 यांनी पॅव्हेलियनला परत गेले. हसन अलीने एकूण 156 धावा केल्या. मिथुनने चार चौकारांच्या मदतीने 84 चेंडू खेळले आणि अर्धशतक झळकावलं.

अनुभवी शोएब मलिक (३०) आणि असिफ अली (३१) या दोघांच्या साथीनं त्याने पाकिस्तानला विजयी धावसंख्या गाठून देण्याचा प्रयत्न केला. पण या साऱ्यांचेच प्रयत्न तोकडे पडले. इमामने ८३ धावा केल्या. या खेळीत केवळ २ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. या तिघांव्यतिरिक्त इतर फलंदाजांना आपली छाप उमटवता आली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2018 08:27 AM IST

ताज्या बातम्या