मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Asia Cup : 'भविष्यातील नामुश्की टाळण्यासाठी रोहितनं धोनीकडून 5 गोष्टी शिकाव्यात!'

Asia Cup : 'भविष्यातील नामुश्की टाळण्यासाठी रोहितनं धोनीकडून 5 गोष्टी शिकाव्यात!'

आशिया कपमधील निराशाजनक पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) महेंद्रसिंह धोनीकडून 5 गोष्टी शिकल्या पाहिजेत.

आशिया कपमधील निराशाजनक पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) महेंद्रसिंह धोनीकडून 5 गोष्टी शिकल्या पाहिजेत.

आशिया कपमधील निराशाजनक पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) महेंद्रसिंह धोनीकडून 5 गोष्टी शिकल्या पाहिजेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

 मुंबई, 8 सप्टेंबर : आशिया कप टी-20 क्रिकेट स्पर्धा 2022 मध्ये (Asia Cup 2022) भारतीय टीमला (Team India) अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. भारतीय टीम या स्पर्धेतील विजेतेपदाची प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरली होती, परंतु  टीमचं आव्हान फायनलपूर्वीच संपुष्टात आले. टीम इंडियाच्या खराब कामगिरीचा दबाव  कॅप्टन रोहित शर्मावर (Rohit Sharma) श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) सुपर-4च्या दुसऱ्या मॅचच्या शेवटच्या क्षणी स्पष्टपणे दिसत होता.

भारताच्या पराभवाबरोबरच रोहितची प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट चाहत्यांना फारशी आवडली नाही. विशेषत: टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीशी (MS Dhoni) त्याची तुलना करणाऱ्या फॅन्सना यामुळे मोठा धक्का बसला आहे.  रोहित आणि धोनीच्या अप्रोचमध्ये काही साम्य आहे का? रोहितने आपल्या माजी कॅप्टन धोनीकडून कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत? याबद्दल 2007 मध्ये T-20 वर्ल्ड कप (T-20I World Cup) जिंकणाऱ्या भारतीय संघाचे कोच राहिलेले लालचंद राजपूत (Lalchand Rajput) यांनी न्यूज18 हिंदीशी संवाद साधताना चर्चा केली. या संभाषणातील ठळक मुद्दे जाणून घेऊयात.

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) हे एका शैलीचे कॅप्टन आहेत का, ज्यांना आपण पॉप्युलर टर्ममध्ये कॅप्टन कूलदेखील म्हणतो? या प्रश्नाच्या उत्तरात लालचंद म्हणाले की, ‘रोहित शर्मा पाच वेळा आयपीएल जिंकलेल्या टीमचा कॅप्टन आहे. T-20 क्रिकेटमध्ये कॅप्टन्सी कशी करायची, हे त्याला माहीत आहे. टीम कशी मॅनेज (Team Management) केली जाते, याचीही त्याला कल्पना आहे. त्यामुळे तो जास्तीतजास्त वेळा शांत असतो. पण टीम हारते किंवा गोष्टी तुमच्या विरोधात जातात, तेव्हा फ्रस्ट्रेशन (Frustration) बाहेर पडतं. तुमची इच्छा असूनही तुम्ही तुमची निराशा लपवू शकत नाही आणि हे सामान्य आहे. माझ्या मते रोहित धोनीकडून खूप काही शिकला आहे. रोहित हा शांत चित्ताने कॅप्टन्सी करणारा कूल कॅप्टन आहे, यात शंका नाही,’ असं राजपूत म्हणाले.

PAK vs AFG: आधी खुर्चा फेकल्या मग कॉलर धरली, क्रिकेटप्रेमींचा मैदानात तुफान राडा

 रोहितने धोनीकडून कोणते धडे घ्यावे?

धडा क्रमांक 1 – शांत राहा

महेंद्रसिंह धोनी हा भारताला  3  आयसीसी स्पर्धा जिंकून देणारा एकमेव कॅप्टन आहे. त्यामुळे त्याच्याकडून रोहित शर्माने काय शिकायला हवं? या प्रश्नाच्या उत्तरात लालचंद म्हणतात, ‘कॅप्टनने शांत असणं आवश्यक आहे. त्याने मैदानावर कधीच आपला संयम गमावू नये. जर तुम्ही संयम गमावला नाही तर कितीही दबावाच्या परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. जर तुम्ही संयम गमावला तर त्याचा फक्त तुमच्या निर्णयांवरच परिणाम होत नाही, तर टीमवरही नकारात्मक परिणाम होतो. कॅप्टनने संयम गमावल्यास टीमचं मनोबल कमी होऊ शकतं.’

धडा क्रमांक 2 –  खेळाडूंना सपोर्ट करा

झिम्बाब्वे टीमचे टेक्निकल डायरेक्टर असलेले राजपूत पुढे म्हणाले, ‘धोनी आपल्या खेळाडूंना पूर्णपणे पाठिंबा द्यायचा, हे आपण सर्वांनी पाहिलंय. ते खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही खेळाडूंना पाठिंबा देता तेव्हा ते चांगली कामगिरी करतात. रोहितलाही धोनीकडून हे नक्कीच शिकता येईल.’

 धडा क्रमांक 3 – खेळाडूंवर दबाब आणू नका

लालचंद म्हणाले की, ‘इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये (International Cricket) दबाव असणं स्वाभाविक आहे. पण एक चांगला कॅप्टन तोच असतो जो हा दबाव आपल्या सहकाऱ्यांवर टाकत नाही. तो त्यांना हवं तसं खेळण्याची संधी देतो. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीममध्ये ही गोष्ट नेहमीच पाहायला मिळते. रोहित किंवा इतर कोणत्याही कॅप्टनने ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. त्यामुळे त्यांचं काम सोपं होईल.’

Asia Cup 2022 : 2 बॉल 2 सिक्स, थरारक सामन्यात पाकिस्तानचा विजय, भारताचं आव्हान संपुष्टात

धडा क्रमांक 4 – खेळाडूंचा कॉन्फिडन्स वाढवा

‘कोणत्याही कॅप्टनने आपल्या सहकारी खेळाडूंवर विश्वास ठेवणंच नव्हे तर तो व्यक्त करणंही महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या टीममेटला त्याच्या क्षमतेवर तुमचा विश्वास असल्याचं दाखवता त्यानंतर तो खेळाडू आणखी चांगली कामगिरी करतो,’ असं लालचंद म्हणाले. या वेळी लालचंद राजपूत यांनी एमएस धोनीचा जोगिंदर शर्माशी (Jiginder Sharma) संबंधित एक किस्साही सांगितला.

धडा क्रमांक 5 - प्रॅक्टिस सेशनमध्ये मॅचचे नियोजन करा

लालचंद राजपूत म्हणाले की, ‘धोनी अनेकदा प्रॅक्टिस सेशनमध्ये (Practice Session) मॅचचे नियोजन करत असे. कोणत्याप्रसंगी कोणत्या खेळाडूचा योग्य वापर करायचा हे तो ठरवायचा. हे करताना धोनीने विरोधी टीमला त्याच्या या प्लॅनिंगची किती कल्पना असू शकते, हेही लक्षात ठेवायचा. धोनी मॅचमध्ये त्याच्या निर्णयांनी आश्चर्यचा धक्का द्यायचा, हे आपण सर्वांनी पाहिलंय. खरं तर ही धोनीची स्ट्रॅटर्जी असायची, जी कुणालाच माहीत नसे. रोहितलादेखील अशा योजनांवर काम करावं लागेल.’

या सर्व गोष्टी रोहितला माजी कॅप्टन धोनीकडून रोहित शर्माला शिकता येतील, असं लालचंद राजपूत यांना वाटतं.

First published:

Tags: Cricket news, MS Dhoni, Rohit sharma