Ashes : कसोटीच्या पहिल्याच दिवशी पंचांचे 7 निर्णय चुकले!

Ashes : कसोटीच्या पहिल्याच दिवशी पंचांचे 7 निर्णय चुकले!

वर्ल्ड कपनंतर आता अॅशेस कसोटीतही पंचांच्या चुका सुरूच, जगातील सर्वात महागड्या पंचांनी 4 निर्णय दिले चुकीचे

  • Share this:

लंडन, 02 ऑगस्ट : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेची सुरुवातच वादाने झाली आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडने वर्चस्व राखलं आहे. मात्र, सामन्यात पंचांच्या चुकांची चर्चा आता होत आहे. पाकिस्तानचे आलीम डार आणि वेस्ट इंडिजचे जोएल विल्सन यांनी तब्बल 7 चुका केल्या. आलीम डार यांनी 4 तर जोएल विल्सन यांनी 3 निर्णय चुकीचे दिले.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या बॅटला लागून यष्टीरक्षकाने झेल घेतला मात्र आलीम डार यांनी नाबाद ठरवलं. त्यानंर वॉर्नर पायचित झाला. त्यात रिप्लेमध्ये चेंडू स्टम्पबाहेर जात असल्याचं दिसलं. जोएल विल्सन यांनी ख्वाजाला झेलबाद दिलं नाही. रिव्ह्यूमध्ये त्यांना निर्णय बदलावा लागला. त्यानंतर पुन्हा आलीम डार यांनी स्टीव्ह स्मिथला पायचित दिलं. यात ऑस्ट्रेलियानं रिव्ह्यू घेतला. त्यामध्ये स्मिथ पायचित नसल्याचं दिसलं.

पहिल्याच कसोटी इतके निर्णय चुकल्यानं दिग्गज क्रिकेटपटूसुद्धा भडकले. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मार्क वॉ यांनी आलीम डार यांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले. तर समालोचन करणारे इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल अथर्टन यांनीसुद्धा पंचांची कामगिरी सुमार असल्याचं म्हटलं.

वर्ल्ड कपमध्येसुद्धा पंचांच्या चुकीचा फटका संघांना बसला आहे. अंतिम सामन्यात धर्मसेना यांनी ओव्हर थ्रोवर दिलेल्या धावा सुद्धा वादाचा विषय ठरल्या आहेत. त्यावर आयसीसीने धर्मसेना यांची बाजू घेतली तसेच त्यांच्या निर्णयाचं कौतुकही केलं होतं. धर्मसेना यांनी आपण चुकलो म्हटलं पण त्याबद्दल कोणताही पश्चाताप नसल्याचं सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा अॅशेसमध्ये पंचांच्या चुका झाल्यानं त्याची चर्चा होत आहे.

अ‍ॅशेस मालिका: इंग्लंडच्या प्रेक्षकांनी केला कहर, मैदानात रडताना दिसला स्टीव्ह स्मिथ!

Army कॅम्पमधील धोनीचा पहिला फोटो; जवानांनी घेरलं आणि...

SPECIAL REPORT: भाजपचा 'शो' हाऊसफुल्ल, मेगाभरती बंद करण्याची वेळ!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 08:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading