प्रेक्षकांनी रडवलं पण त्यानं जिंकलं मैदान, सचिन-विराटलाही टाकलं मागे

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथनं 16 महिन्यांनी कसोटीत पुनरागमन करताना संघाचा डाव सावरत शतकी खेळी केली.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2019 09:16 AM IST

प्रेक्षकांनी रडवलं पण त्यानं जिंकलं मैदान, सचिन-विराटलाही टाकलं मागे

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने 16 महिन्यांनी कसोटीत पुनरागमन केलं. त्याने 144 धावांची तडाखेबाज शतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.

चेंडूशी छेडछाड प्रकरणानंतर स्टीव्ह स्मिथला अनेकवेळा स्टेडियममध्ये डिवचण्याचा प्रयत्न केला गेला. कसोटीच्या पहिल्या दिवशीसुद्धा इंग्लंडच्या प्रेक्षकांनी स्मिथ रडत असलेल्या चेहऱ्याचा फोटो असलेले मास्क लावले होते.

स्मिथने प्रेक्षकांनी केलेल्या हूटिंगने विचलीत न होता शतक झळकावलं. त्याचं हे कसोटीतील 24 वं तर अॅशेसमधील 9 वं शतक आहे. फक्त 3 खेळाडू स्मिथच्या पुढे आहेत. यात डॉन ब्रॅडमन 19, जॅक हॉब्स 12 तर स्टीव्ह वॉच्या नावावर 10 शतकं आहेत.

कसोटीत 118 डावांत 24 शतकं करण्याची कामगिरी स्मिथने केली आहे. याबाबतीत त्यानं सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला मागे टाकलं आहे. सचिनने 125 डावात तर विराटने 123 डावात 24 शतकं केली होती.

सर्वात वेगवान 24 शतकं करण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी फक्त 66 डावात ही कामगिरी केली होती.

Loading...

स्मिथच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 284 धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं 122 धावांत 8 विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी स्मिथने डाव सावरला आणि ऑस्ट्रेलियाला 284 धावांवर पोहचवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2019 09:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...