ब्रिस्बेन, 11 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये (Australia vs England) इंग्लंडचा 9 विकेट्सनं पराभव केला. इंग्लंडने दिलेले 20 रनचे आव्हान पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा नियमित ओपनर डेव्हिड वॉर्नर (David Warner) बॅटींगसाठी आला नाही. पहिल्या इनिंगमध्ये 94 रन करणारा वॉर्नर मैदानात न उतरल्यानं नव्या चर्चाांना सुरूवात झाली होती. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जोश हेजलवूड (Josh Hazelwood) देखील संपूर्ण फिट नसल्यानं ऑस्ट्रेलियन फॅन्सच्या काळजीत भर पडली होती, अखेर ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन पॅट कमिन्सने (Pat Cummins) त्यांच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहे.
काय म्हणाला कमिन्स?
डेव्हिड वॉर्नरला बॅटींग करत असताना मार्क वूड आणि बेन स्टोक्स यांचे बॉल छातीला लागले होते. त्यामुळे तो जखमी झाला होता. वॉर्नरनं नंतर फिल्डिंग केली नाही. तसेच तो शनिवारी बॅटींगसाठीही उतरला नाही. त्यामुळे 16 डिसेंबरपासून सुरू होणारी टेस्ट वॉर्नर खेळणार का ? हा प्रश्न निर्माण झाला होता.
ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर जोश हेजलवूड देखील तिसऱ्या दिवशी खेळताना जखमी झाला होता. त्यामुळे त्याने सुरुवातीला बॉलिंग केल्यानंतर दिवसभर बॉलिंग केली नव्हती. हेजलवूडने चौथ्या दिवशी बॉलिंग केली आणि जोस बटलरची विकेट घेतली. पहिल्या टेस्टनंतर मीडियाशी बोलताना कमिन्सने दोघांच्या दुखापतीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
'आम्हाला मॅच जिंकण्यासाठी फक्त 20 रनची आवश्यकता होती त्यामुळे वॉर्नरला मैदानात उतरवले नाही, तो पुढच्या टेस्टमध्ये नक्की खेळेल, असे कमिन्सने स्पष्ट केले.जोश हेजलवूडला तिसऱ्या दिवशी थोडा त्रास होत होता. त्याच्या दुखापतीचे स्कॅन करण्यात आले आहे. त्यामध्ये फार गंभीर काही आढळले नाही. आम्हाला त्याचा वर्कलोड मॅनेज करायला हवा. कारण, तो आम्हाला पूर्ण सीरिजमध्ये हवा आहे,' असे कमिन्सने स्पष्ट केले.
धोनीच्या शिष्याचं सलग तिसऱ्या मॅचमध्ये शतक, टीम इंडियातील धवनची जागा धोक्यात
पॅट कमिन्सची ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन म्हणून सुरूवात विजयानं झाली आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 2017, 2013, 2006 आणि 2002 साली ब्रिस्बेन टेस्ट जिंकत अॅशेस सीरिज जिंकली होती. यंदाही मागील चार सीरिजमधील परंपरा कायम राहील अशी आशा कमिन्सनं व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket news