मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ashes 2nd Test : स्मिथच्या सहकाऱ्याची कमाल, थेट डॉन ब्रॅडमनना टाकलं मागं!

Ashes 2nd Test : स्मिथच्या सहकाऱ्याची कमाल, थेट डॉन ब्रॅडमनना टाकलं मागं!

Ashes 2nd Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये सुरू असलेल्या टेस्टचा आज (शुक्रवार) दुसरा दिवस आहे.

  • Published by:  News18 Desk

अ‍ॅडलेड, 17 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये सुरू असलेल्या टेस्टचा आज (शुक्रवार) दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी पहिल्याच सेशनमध्ये मार्नस लाबुशेननं (Marnus Labuschagne) शतक झळकावले. लाबुशेनच्या टेस्ट कारकिर्दीतील हे सहावं शतक आहे. या खेळीच्या दरम्यान त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 2000 रन देखील पूर्ण केले. लाबुशेन शतकानंतर लगेच (103 रन) आऊट झाला. पण, या खेळीच्या दरम्यान त्याने अनेक रेकॉर्ड केले आहेत.

लाबुशेननं 20  टेस्ट आणि 34 इनिंगमध्ये 2000 रन पूर्ण केले. सर्वात वेगानं 2 हजार रन करणारा तो पाचवा बॅटर बनला आहे.  त्याच्या पुढे सर डॉन ब्रॅडमन (15 मॅच, 22 इनिंग), वेस्ट इंडिजचे जॉर्ज हेडली (17 मॅच, 32 इनिंग), इंग्लंडचे हर्बट सटक्लिफ (22 मॅच 33 इनिंग) आणि ऑस्ट्र्लियाचा माईक हसी (20 मॅच 33 इनिंग) हे पाच जण आहेत.

डॉन ब्रॅडमनला टाकले मागे

लाबुशेननं यावेळी एका बाबतील ब्रॅडमन यांनाही मागं टाकलं आहे. त्याने 20 मॅचमध्ये 17 वेळा 50 चा टप्पा पाप केला आहे. ब्रॅडमननं 20 मॅचमध्ये 15 वेळा ही कामगिरी केली होती. या यादीत वेस्ट इंडिजचे ब्रायन लारा आणि सर व्हिव्हियन रिचर्ड्स हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. या दोघांनीही 20 मॅचमध्ये 13 वेळा 50 पेक्षा जास्त रन केले आहेत.

29 वर्षांचा इतिहास 'तो' बदलणार, गांगुलीचा विराटवरील विश्वास अद्याप कायम

अ‍ॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची स्थिती भक्कम झाली आहे. दुसऱ्या दिवशी डिनर ब्रेकपर्यंत 5 आऊट 302 रन केले. स्टीव्ह स्मिथनं अर्धशतक झळकावलं असून तो मोठ्या खेळीकडे वाटचाल करत आहे. पहिल्या सेशनमध्ये 27 ओव्हरमध्ये 81 रन निघाले आणि 3 विकेट्स पडल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सनं 2 तर जो रूट, स्टुअर्ट ब्रॉड आणि रॉबिन्सन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.

First published:

Tags: Ashes, Australia, England