मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ashes: 'हे' 13 वर्षाच्या मुलांना शिकवतात , इंग्लिश क्रिकेटपटूंवर माजी कॅप्टन नाराज

Ashes: 'हे' 13 वर्षाच्या मुलांना शिकवतात , इंग्लिश क्रिकेटपटूंवर माजी कॅप्टन नाराज

अ‍ॅशेस सीरिजमध्ये (Ashes Series) इंग्लंडची  खराब कामगिरी सुरूच आहे. ब्रिस्बेन टेस्ट गमावल्यानंतर  अ‍ॅडलेडमध्येही त्यांच्यासमोर पराभवाचा धोका आहे

अ‍ॅशेस सीरिजमध्ये (Ashes Series) इंग्लंडची खराब कामगिरी सुरूच आहे. ब्रिस्बेन टेस्ट गमावल्यानंतर अ‍ॅडलेडमध्येही त्यांच्यासमोर पराभवाचा धोका आहे

अ‍ॅशेस सीरिजमध्ये (Ashes Series) इंग्लंडची खराब कामगिरी सुरूच आहे. ब्रिस्बेन टेस्ट गमावल्यानंतर अ‍ॅडलेडमध्येही त्यांच्यासमोर पराभवाचा धोका आहे

  • Published by:  News18 Desk

अ‍ॅडलेड, 19 डिसेंबर : अ‍ॅशेस सीरिजमध्ये (Ashes Series) इंग्लंडची  खराब कामगिरी सुरूच आहे. ब्रिस्बेन टेस्ट गमावल्यानंतर  अ‍ॅडलेडमध्येही त्यांच्यासमोर पराभवाचा धोका आहे. इंग्लंडची खराब बॅटींग ही दोन्ही टेस्टमधील समान समस्या आहे. कॅप्टन जो रूट (Joe Root) आणि डेव्हिड मलान (Dawid Malan) यांचा अपवाद वगळता इंग्लंडचा एकही बॅटर या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात  यशस्वी झालेला नाही. इंग्लंड टीमच्या खराब कामगिरीवर माजी कॅप्टन एलिस्टर कूक (Alastair Cook) नाराज झाला आहे. त्याने इंग्लंड टीममधील खेळाडूंची तुलना 13 वर्षांच्या मुलाशी केली आहे.

इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जास्त टेस्ट रन करणाऱ्या कूकने कॉमेंट्री करताना आपल्या टीमची खरडपट्टी काढली. जी गोष्ट 13 वर्षांच्या मुलाला शिकवली जाते ते इंग्लंडच्या बॅटर्सना समजवण्याची वेळ आली आहे. तरीही यामधून शिकण्याच्या ऐवजी ते त्याच चुका पुन्हा करत आहेत. ही टीम सातत्याने एकत्र विकेट्स गमावत आहे, असेही कूक म्हणाला.

BT स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करताना कूक म्हणाला, ' या सर्व नेहमीच्या गोष्टी आहेत. खेळाडू आणि कोचसाठी  हे खूप निराशाजनक आहे. तुम्ही एकत्र विकेट्स गमावू शकत नाही. तुमच्याकडे बॅटींग कोच आहे. तो तुम्हाला हे सर्व शिकवतं. एकदा आऊट झाल्यानंतर तो तुम्हाला पुन्हा तयार करतो. 13 वर्षांच्या मुलांना टीम मीटिंगमध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जातात, त्याच चुका तुम्ही करत आहात. एक बॅटींग युनिट म्हणून ही टीम अपयशी ठरली आहे.'

इंग्लंडमध्ये झालेल्या भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्येही (India vs England) जो रूटची टीम पिछाडीवर होती. ब्रिस्बेन टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये जो रूट आणि डेव्हिड मलान यांनी दमदार भागिदारी केली होती. पण, ही जोडी फुटल्यानंतर इंग्लंडची टीम झटपट कोसळली. ऑस्ट्रेलियानं ती मॅच 9 विकेट्सनं जिंकली.

विराट कोहली बनला सर्वात खराब कॅप्टन, भारतीय क्रिकेटची गेली जगासमोर लाज

अ‍ॅडलेड टेस्टमध्येही तेच घडत आहे. दुसऱ्या दिवशी पहिल्या सेशनध्ये रूट आणि मलान यांनी शतकी भागिदारी केली. दुसऱ्या सेशनमध्ये हे दोघे आऊट झाल्यानंतर उर्वरित टीम 100 रनच्या आत आऊट झाली.  या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 9 आऊट 476 रन केले. त्याला उत्तर देताना इंग्लंडची पहिली इनिंग 236 रनवरच संपुष्टात आली.

First published:

Tags: Ashes, Australia, Cricket, England