मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ashes Series: अ‍ॅशेस सीरिज धोक्यात! इंग्लंडचे 10 पेक्षा जास्त खेळाडू माघार घेण्याच्या तयारीत

Ashes Series: अ‍ॅशेस सीरिज धोक्यात! इंग्लंडचे 10 पेक्षा जास्त खेळाडू माघार घेण्याच्या तयारीत

क्रिकेट विश्वातील प्रतिष्ठेच्या सीरिजमध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजचा  (Ashes Series) समावेश होतो. या सीरिजमधून 10 पेक्षा जास्त इंग्लंडचे क्रिकेटपटू  माघार घेण्याच्या तयारीत आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 28 ऑगस्ट :  क्रिकेट विश्वातील प्रतिष्ठेच्या सीरिजमध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजचा  (Ashes Series) समावेश होतो. यंदा ही 5 टेस्ट मॅचची सीरिज डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डा (ECB) गेल्या अनेक महिन्यांपासून या सीरिजचं नियोजन करत आहेत. मात्र त्यांच्या या नियोजनाला इंग्लंडचे क्रिकेटपटू धक्का देण्याच्या तयारीत आहेत. कारण, 10 पेक्षा जास्त इंग्लंडचे क्रिकेटपटू या सीरिजमधून माघार घेण्याच्या विचारात आहेत.

अ‍ॅशेस सीरिजला 8 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये क्वारंटाईनचे नियम अतिशय कडक आहेत.  इंग्लंडचे क्रिकेटपटू 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या काळात कुटुंबासह क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या विरोधात आहेत. 'टेलिग्राफ'मधील वृत्तानुसार इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत या नियमांवर नाराजी व्यक्त केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (CA) अद्याप या विषयावर तोडगा काढता आलेला नाही. त्यामुळे इंग्लडचे अनेक क्रिकेटपटू टोकाचा निर्णय घेऊ शकतात.

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना बांगलादेशच्या दौऱ्यातून परतल्यानंतर क्वारंटाईनचे कडक नियम पाळावे लागले होते. त्यांना ट्रेनिंग करण्यास किंवा रुममधून बाहेर पडण्यासही बंदी होती. विशेष म्हणजे हे सर्व क्रिकेटपटू बायोबबलमधूनच मायदेशी परतले होते.

इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना कुटुंबाला दौऱ्यावर आणण्याची परवानगी आहे. मात्र कोणता क्रिकेटपटू नंतर येणार असल्यास त्याला 14 डिसेंबरनंतरच परवानगी मिळणार आहे. त्या परिस्थितीमध्ये त्याला ख्रिसमसच्या एक दिवस आधीपर्यंत क्वारंटाईन राहवं लागेल. यापूर्वीही अनेक क्रिकेटपटूंनी क्वारंटाईन कालावधीमधील त्रासाचा उल्लेख केला आहे. या क्रिकेटपटूंना बराच काळ त्यांच्या मुलांसह हॉटेलातील बंद खोलीत राहण्याची इच्छा नाही.

IND vs ENG: विराट कोहलीला आज 6 रेकॉर्डसची संधी, सचिन-पॉन्टिंगला टाकणार मागे!

पाकिस्तान दौराही अनिश्चित

इंग्लंडची टीम ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी 2 T20 सामने होणार आहेत. तसंच इंग्लंडची महिला टीमही 2 टी20 आणि 3 वन-डे सामन्यांसाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे. मात्र काबूल विमानतळावर झालेला दहशतवादी हल्ला आणि अफगाणिस्तानवरील तालिबानचा कब्जा यामुळे हा दौराही अनिश्चित बनलाय.

इंग्लंडचे खेळाडू पाकिस्तानमधील सुरक्षेबाबतही चिंतेत आहेत. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे सुरक्षा अधिकारी रेग डिक्सन या आठवडयात पाकिस्तानमध्ये जाणार असून तेथील सुरक्षेचा आढावा घेणार आहेत. इंग्लिश टीमनं 2005 नंतर एकदाही पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.

First published:

Tags: Cricket news, England