अॅडलेड, 19 डिसेंबर : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) यांच्यात सध्या प्रतिष्ठेची अॅशेस सीरिज सुरु (Ashes Series) आहे. या सीरिजमधील दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स (Pat Cummins) खेळू शकला नाही. त्यामुळे व्हाईस कॅप्टन स्टीव्ह स्मिथकडे (Steve Smith) ऑस्ट्रेलियाचं नेतृत्त्व आहे. तब्बल तीन वर्षांनंतर स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन बनला आहे. स्मिथनं ही जबाबदारी भलतीच गांभीर्यानं घेतलीय. त्याची बायको डेनी विलीसनं (Dani Willis) स्मिथचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये हेच दिसून येत आहे.
डेनीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत स्मिथ हॉटेलमधील रूममध्ये रात्री 1 वाजता देखील बॅटींगचा सराव करत आहे. स्मिथ शॅडो बॅटींग करत असल्याचे या व्हिडीओतून दिसत आहे. स्मिथ क्रिकेटच्या मैदानात असो किंवा हॉटेलमध्ये त्याच्या मनात कायम बॅटींगचा विचार असतो, हेच या व्हिडीओतून सिद्ध झाले आहे.
स्टीव्ह स्मिथचा खास व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
स्मिथ कॅप्टनसी करत असलेल्या अॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं घट्ट पकड मिळवलीय. ऑस्ट्रेलियानं पहिली इनिंग 9 आऊट 473 रनवर घोषित केली. पहिल्या इनिंगमध्ये स्मिथनं कॅप्टनला साजेसा खेळ केला. पण, त्याचे शतक फक्त 7 रनने हुकले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी जोरदार कामगिरी करत इंग्लंडची पहिली इनिंग 236 रनवर संपुष्टात आणली.
Ashes: 'हे' 13 वर्षाच्या मुलांना शिकवतात , इंग्लिश क्रिकेटपटूंवर माजी कॅप्टन नाराज
ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 237 रनची आघाडी घेतल्यानंतरही फॉलो ऑन न देण्याचा निर्णय घेतला. स्मिथ दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र कमाल करू शकला नाही. त्याला फक्त 6 रनवर रॉबिन्सननं आऊट केले. पाच टेस्टच्या या अॅशेस सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाकडे सध्या 1-0 अशी आघाडी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.