• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Ashes सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम जाहीर, T20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या खेळाडूंना जागा नाही

Ashes सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम जाहीर, T20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या खेळाडूंना जागा नाही

टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियानं आता अ‍ॅशेस सीरिजवर (Ashes Series) लक्ष केंद्रीत केले आहे. टी20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या खेळाडूंचा या टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही.

 • Share this:
  मुंबई, 17 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियानं आता अ‍ॅशेस सीरिजवर (Ashes Series) लक्ष केंद्रीत केले आहे. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या या प्रतिष्ठेट्या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्टसाठी अनुभवी बॅटर उस्मान ख्वाजा आणि ट्रेविस हेडचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तर टी20 वर्ल्ड कपमधील  (T20 World Cup) सेमी फायनल जिंकून देणारा मॅथ्यू वेड (Matthew Wade) आणि फायनलमधील 'मॅन ऑफ द मॅच' मिचेल मार्शचा  (Mitchell Marsh) टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. टीम पेनकडं  (Tim Paine) ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमची कॅप्टनसी कायम ठेवण्यात आली आहे. मागच्या महिन्यात फास्ट बॉलर जेम्स पॅटीन्सननं अचानक निवृत्ती जाहीर केली. त्याच्या जागी मायकल नेसर आणि झाय रिचर्डसनचा समावेश करण्यात आला आहे. हे दोघे मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड या फास्ट बॉलर्सच्या त्रिकुटाला साथ देतील. जखमी विल पुकोवस्कीच्या जागी मार्कस हॅरीसचा समावेश करण्यात आला आहे. तो डेव्हिड वॉर्नरसह टीमची ओपनिंग करेल. अ‍ॅशेस सीरिजमधील पहिली टेस्ट 8 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवर होणार आहे. ही डे-नाईट टेस्ट असेल. त्यानंतर अ‍ॅडलेड, मेलबर्न, सिडनी आणि पर्थमध्ये पुढील टेस्ट होतील. यापूर्वी 2019 साली झालेली अ‍ॅशेस सीरिज 2-2 ने बरोबरीत झाली होती. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबूशेन तिसऱ्या आणि स्टीव्ह स्मिथ चौथ्या क्रमांकावर येणार हे नक्की आहे. पाचव्या क्रमांकावर मॅथ्यू वेडच्या जागी ट्रेविस हेड खेळेल. ख्वाजनं 2019 पासून टेस्ट मॅच खेळलेली नाही. शेफील्ड शील्ड स्पर्धेतील कामगिरीमुळे त्याचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. ख्वाजानं त्या स्पर्धेत 68 च्या सरासरीनं दोन शतकांसह 404 रन काढले होते. ऑलराऊंडर म्हणून मिचेल मार्शच्या जागी कॅमेरून ग्रीनला प्राधान्य देण्यात आले आहे. तर नॅथन लायनचा बॅकअप म्हणून मायकल स्वेपसनचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. कॅप्टन रोहित आणि कोच द्रविडची पहिली भेट कधी झाली? दोघांनी सांगितला 'तो' किस्सा VIDEO ऑस्ट्रेलिया टीम: टीम पेन (कॅप्टन), पॅट कमिन्स (व्हाईस कॅप्टन), कॅमेरून ग्रीन, मार्कस हॅरीस, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लबूशेन, नॅथन लायन, मायरल नेसर, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मायकल स्वेपसन आणि डेव्हिड वॉर्नर
  Published by:News18 Desk
  First published: