मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ashes Series : बटलर बनला 'सुपर मॅन', जबरदस्त कॅच घेत सर्वांना केले थक्क! VIDEO

Ashes Series : बटलर बनला 'सुपर मॅन', जबरदस्त कॅच घेत सर्वांना केले थक्क! VIDEO

स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) मार्कस हॅरीसला झटपट आऊट केले. हॉरीसने फक्त 3 रन घेतले. हॉरीसला आऊट करण्याचे श्रेय हे ब्रॉडपेक्षा इंग्लंडचा विकेट किपर जोस बटलरचे (Jos Buttler) आहे.

स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) मार्कस हॅरीसला झटपट आऊट केले. हॉरीसने फक्त 3 रन घेतले. हॉरीसला आऊट करण्याचे श्रेय हे ब्रॉडपेक्षा इंग्लंडचा विकेट किपर जोस बटलरचे (Jos Buttler) आहे.

स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) मार्कस हॅरीसला झटपट आऊट केले. हॉरीसने फक्त 3 रन घेतले. हॉरीसला आऊट करण्याचे श्रेय हे ब्रॉडपेक्षा इंग्लंडचा विकेट किपर जोस बटलरचे (Jos Buttler) आहे.

मुंबई, 16 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील दुसरी टेस्ट सध्या अ‍ॅडलेडमध्ये सुरू आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा या टेस्टमधील कॅप्टन स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या ओपनिंग जोडीला याचा फायदा उठवता आला नाही. त्यांची पहिली विकेट झटपट गेली.

स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) मार्कस हॅरीसला झटपट आऊट केले. हॉरीसने फक्त 3 रन घेतले. हॉरीसला आऊट करण्याचे श्रेय हे ब्रॉडपेक्षा इंग्लंडचा विकेट किपर जोस बटलरचे (Jos Buttler) आहे. ऑस्ट्रेलियाच्या इनिंगमधील आठव्या ओव्हरमध्ये ब्रॉडने टाकलेला तिसऱ्या बॉलवर हॅरीसनं जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला.

हॅरीसच्या बॅटला लागून तो बॉल मोठ्या वेगाने स्लिप आणि विकेट किपरच्या मधून जात होता. त्यावेळी बटलरने झेपावत एका हातानेच हॅरीसचा कॅच घेतला. त्याचा हा कॅच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अ‍ॅडलेडमध्ये या सीरिजमधील डे-नाईट टेस्ट होत आहे. या टेस्टच्या पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडला हॅरीसच्या रूपाने एकमेव यश मिळाले. हॅरीस आऊट झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशने यांनी सावध खेळ करत संपूर्ण सेशन खेळून काढले.

ऑस्ट्रेलियाला दुसरी टेस्ट सुरू होण्यापूर्वीच एक मोठा धक्का बसला. टेस्ट टीमचा कॅप्टन पॅट कमिन्स (Pat Cummins) आऊट झाला आहे. कमिन्स बुधवारी रात्री हॉटेलमध्ये कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे उघड झाले. त्यामुळे तो दुसऱ्या टेस्टमधून आऊट झाला. कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन असेल, असे जाहीर करण्यात आले. तर मिचेल नासेरचा (Michael Neser) प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. नासेरची ही पहिलीच टेस्ट आहे.

PSL 2022: PCB शी भांडणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूचे घूमजाव, आता म्हणाला...

 पॅट कमिन्सची नंतर कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्याच रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती आहे.  तरीही त्याला खबरदारीचा उपाय म्हणून 7 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. कमिन्सने बायो-बबलचं उल्लंघन केलेलं नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे. मेलबर्नमध्ये 26 डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या टेस्टसाठी तो उपलब्ध असेल अशी आशा आहे.

First published:
top videos

    Tags: Ashes, Australia, England, Video viral