मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ashes Series: IPL मध्ये 14 कोटींची कमाई करणाऱ्या खेळाडूचा ऑस्ट्रेलियन टीममध्ये समावेश

Ashes Series: IPL मध्ये 14 कोटींची कमाई करणाऱ्या खेळाडूचा ऑस्ट्रेलियन टीममध्ये समावेश

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील दुसऱ्या टेस्टला गुरुवारी सुरूवात होत आहे. या टेस्टसाठी आयपीएल लिलावात (IPL 2021 Auction) 14 कोटींची कमाई करणाऱ्या खेळाडूचा ऑस्ट्रेलियाने समावेश केला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 15 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील दुसऱ्या टेस्टला गुरुवारी सुरूवात होत आहे. अ‍ॅडलेडमध्ये होणारी ही टेस्ट डे-नाईट आहे. या सीरिजमधील पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सनं जिंकली होती. आता दुसरी टेस्टही जिंकून मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवण्याचा यजमान टीमचा प्रयत्न असेल. ऑस्ट्रेलियाने या टेस्टची प्लेईंग 11 (Playing 11) जाहीर केली असून त्यामध्ये एक बदल केला आहे.

ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये फास्ट बॉलर जोश हेजलवूड (Josh Hazlewood) जखमी झाला होता. हेजलवूडच्या जागी झाय रिचर्डसनचा  (Jhye Richardson) Playing 11 मध्ये समावेश केल्याची घोषणा ऑस्ट्र्लियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने (Pat Cummins) केली आहे. रिचर्डसनला आयपीएल 2021 च्या लिलावात (IPL 2021 Auction) पंजाब किंग्जने 14 कोटींना खरेदी केले होते. मात्र खराब कामगिरीमुळे त्याला रिटेन करण्यात आले नाही.

झाय रिचर्डसनने आजवर 13 वन-डे मॅच खेळल्या असून त्यामध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत. तर 14 टी20 इंटरनॅशनलमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 2019 साली श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले होते. त्याने आजवर 2 टेस्टमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियन टीमसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे डेव्हिड वॉर्नर (David Warner) फिट असून तो दुसऱ्या टेस्टमध्ये खेळणार आहे. वॉर्नरला ब्रिस्बेन टेस्टच्या दरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर तो दुसऱ्या इनिंगमध्ये फिल्डिंग आणि बॅटींग करण्यासाठी मैदानात उतरला नव्हता.

IND vs SA : 'अजिंक्य रहाणेला टेस्ट टीमचा उपकर्णधार करा,' माजी क्रिकेटपटूची मागणी

अ‍ॅडलेड टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन टीम :  डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरीस, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि झाय रिचर्डसन

First published:

Tags: Ashes, Australia