मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ashes Series : ऑस्ट्रेलियन खेळाडूचा मैदानातच Moon Walk, बार्मी आर्मीसोबत केले सेलिब्रेशन! VIDEO

Ashes Series : ऑस्ट्रेलियन खेळाडूचा मैदानातच Moon Walk, बार्मी आर्मीसोबत केले सेलिब्रेशन! VIDEO

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टवर ऑस्ट्रेलियानं वर्चस्व मिळवलं आहे.  त्यामुळे टीममध्ये आनंदी वातावरण असून त्याचे उदाहरण मॅच दरम्यान दिसले.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 20 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टवर ऑस्ट्रेलियानं वर्चस्व मिळवलं आहे. आता शेवटच्या दिवशी ही टेस्ट जिंकून 5 टेस्टच्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये (Ashes Series) 2-0 अशी आघाडी घेण्याची संधी ऑस्ट्रेलियाला आहे. ब्रिस्बेनमध्ये झालेली या सीरिजधील पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियानं 9 विकेट्सनं जिंकली होती.

या सीरिजवर आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियन टीमचं वर्चस्व आहे. त्यामुळे टीममध्ये आनंदी वातावरण असून त्याचे उदाहरण शनिवारी मॅच दरम्यान पाहयला मिळाले. ऑस्ट्रेलियाचा बॅटर उस्मान ख्वाजाचा (Usman Khawaja) शुक्रवारी 35 वा वाढदिवस होता. त्याचे सेलिब्रेशन शनिवारी मैदानात झाले. ख्वाजा टेस्टच्या चौथ्या दिवशी राखीव खेळीडू म्हणून मैदानात उतरला होता.

तो फाईन लेगवर फिल्डिंग करत होता. त्यावेळी त्याच्या पाठीमागे इंग्लंड क्रिकेट टीमचे कट्टर समर्थक असलेल्या बार्मी आर्मीचे सदस्य होते. ते पाठीमागून काही तरी ख्वाजाला म्हणाले. त्यानंतर ख्वाजानं अचानक 'मून वॉक' (Moon Walk) सुरू केला. ख्वाजा हा डान्स पाहून सर्व प्रेक्षक चांगलेच खूश झाले. त्यांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या सर्व प्रकाराचा व्हिडीओ शेअर केला आहे. उस्मान ख्वाजा हा ऑस्ट्रेलियम टेस्ट टीममधील प्रमुख बॅटरपैकी एक आहे. या अनुभवी खेळाडूला या सीरिजमध्ये अजून संधी मिळालेली नाही. टीम मॅनेजमेंटनं पहिल्या दोन टेस्टमध्ये मार्कस हॅरीसवर विश्वास दाखवला आहे.

अ‍ॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं दुसरी इनिंग 9 आऊट 230 रनवर घोषित केली. त्यांनी इंग्लंडला विजयासाठी 468 रनचं अवघड टार्गेट दिले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं इंग्लंडच्या 4 विकेट्स घेतल्या होत्या. आता शेवटच्या दिवशी ही मॅच जिंकण्यासाठी इंग्लंडला आणखी 386 रन तर ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सची आवश्यकता आहे.

Ashes Series कव्हर करणाऱ्या 2 पत्रकारांना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश

First published:

Tags: Ashes, Australia, Cricket, England