मुंबई, 19 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस सीरिजवर (Ashes Series) देखील सध्या कोरोनाचे सावट आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स (Pat Cummins) अॅडलेड टेस्टमध्ये खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) ऑस्ट्रेलियाची कॅप्टनसी करत आहे. कमिन्सचे रिपोर्ट सामान्य असून तो मेलबर्न टेस्टमध्ये टीममध्ये परतणार आहे. पण, उर्वरित सीरिजमध्ये टीमला कोरोनाचा कोणताही फटका बसू नये म्हणून 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'ने (Cricket Australia) खेळाडूंवर कडक निर्बंध घातले आहेत.
'डेली मेल' ने दिलेल्या वृत्तानुसार मेलबर्न आणि सिडनीमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या टेस्टच्या दरम्यान कोरोनाचा धोका टाळण्यासाठी कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. एका खेळाडूने दिलेल्या माहितीनुसार त्यांना तीन जणांच्या ग्रुपमध्येच सराव करण्याची परवानगी आहे. याचा अर्थ सर्व बॉलर्सना एकत्र सराव करता येणार नाही. त्याचबरोबर खेळाडूंना रेस्टॉरंटमध्ये खाण्याची देखील बंदी घालण्यात आली आहे. पॅट कमिन्स याच ठिकाणी कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आला होता.
'सन हेरॉल्ड' ने दिलेल्या बातमीनुसार ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही टीमच्या खेळाडूंना नियमांची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आता खेळाडू बारमध्ये जाऊ शकणार नाहीत. त्यांना केस कापण्यासाठी तसेच जिमचा वापर करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. खेळाडूंना मैदानात कोणत्याही फॅनला भेटता येणार नाही किंवा त्यांना स्वाक्षरी देता येणार नाही. त्यांना बाहेर फक्त कुटुंबीय किंवा मित्रांना भेटण्याची परवानगी आहे. पण, त्यानंतर पुन्हा टीममध्ये परतण्यापूर्वी त्यांची कोरोना टेस्ट घेतली जाईल.
स्टीव्ह स्मिथ रात्री 1 वाजता काय करतोय! बायकोनं शेअर केला रूममधील VIDEO
अॅशेस सीरिजमधील तिसरी टेस्ट 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये तर चौथी टेस्ट 5 जानेवारीपासून सिडनीमध्ये होणार आहे. या दोन टेस्ट दरम्यान हे निर्बंध लागू असतील. पाचवी आणि शेवटची टेस्ट 14 जानेवारी रोजी होबार्टमध्ये सुरू होणार आहे. पाच टेस्टच्या या सीरिजमधील पहिली टेस्ट ब्रिस्बेनमध्ये झाली. ती टेस्ट 9 विकेट्सनं जिंकत ऑस्ट्रेलियानं सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashes, Australia, Coronavirus, Cricket news