Ashes : क्रिकेटरनं 16 व्या वर्षी केली होती कॅन्सरवर मात, आता चेंडू दिसत नसताना झळकावलं शतक

Ashes : क्रिकेटरनं 16 व्या वर्षी केली होती कॅन्सरवर मात, आता चेंडू दिसत नसताना झळकावलं शतक

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीवर ऑस्ट्रेलियानं स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेड यांच्या शतकांच्या जोरावर मजबूत पकड मिळवली आहे.

  • Share this:

लंडन, 05 ऑगस्ट : अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं पकड मिळवली आहे. इंग्लंडने पहिल्या डावात आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियानं 7 बाद 487 धावा केल्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेडनं शतकं केली. याच्या जोरावर इंग्लंडसमोर मोठं आव्हान उभा केलं आहे.

स्टीव्ह स्मिथने बंदीनंतर पुनरागमन केलं आहे. तर मॅथ्यू वेडसुद्धा दोन वर्षांनी कसोटी संघात परतला आहे. त्यानं 110 धावांची खेळी केली. यामध्ये त्यानं 17 चौकार मारले. मॅथ्यू वेड यापूर्वी सप्टेंबर 2017 मध्ये शेवटची कसोटी खेळला होता.

इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडलेल्या वेडला कॅन्सरशी झुंज द्यावी लागली होती. वयाच्या 16 व्या वर्षी त्याला कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर केमोथेरपीचा उपचार करून तो बराच काळ मैदानापासून दूर होता. वेडला दृष्टीदोष असून त्याला रंग ओळखता येत नाहीत. त्याला मैदानावरसुद्धा खेळताना याचा त्रास होतो.

ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडनं 22 कसोटी खेळल्या आहेत. यात त्याला फक्त 2 शतकं करता आली आहेत. त्यानं ऑस्ट्रेलिया ए आणि घरेलू स्तरावर जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळंच त्याची अॅशेससाठी संघात निवड करण्यात आली.

कसोटीच्या पहिल्या डावात एका धावेवर बाद झालेल्या मॅथ्यू वेडनं शतक केलं. त्याला शतकासाठी तब्बल सात वर्षे वाट बघावी लागली. त्यानं याआधी 2012 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध शतक केलं होतं.

कलम 370 हटवल्यानंतर काय होणार? पाहा हा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: August 5, 2019, 2:14 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading