VIDEO : तो वेदनेनं विव्हळत असताना आर्चर हसत होता, चाहते भडकले

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला जोफ्रा आर्चरचा वेगवान चेंडू मानेवर लागला आणि तो मैदानावरच कोसळला.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 12:13 PM IST

VIDEO : तो वेदनेनं विव्हळत असताना आर्चर हसत होता, चाहते भडकले

लंडन, 18 ऑगस्ट : अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा चेंडू लागला. त्यामुळं स्टीव्ह स्मिथला मैदान सोडावं लागलं. पण शेवटी तो मैदानात उतरला. मात्र, सलग तिसऱं शतक झळकावण्यापासून त्याला 8 धावा दूर रहावं लागलं. 80 धावांवर खेळत असताना आर्चरचा वेगवान चेंडू स्मिथच्या मानेवर आदळला. तेव्हा तो मैदानावरच कोसळला. आता स्मिथ कोसळला असताना जोफ्रा आर्चर आणि जोस बटलर हसत असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळं चाहत्यांनी जोफ्रा आर्चरला ट्रोल केलं आहे.

मैदानावर स्टीव्ह स्मिथवर डॉक्टर उपचार करत असताना जोफ्रा आर्चर हसत असलेलं दिसलं. जोफ्रा आर्चर जोस बटलरच्या शेजारी असून दोघेही हसत असल्याचं दिसतं. वर्ल्ड कपमध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांची मनं जिंकणाऱ्या जोफ्राच्या या कृतीनंतर मात्र चाहत्यांनी त्याच्यावर सडकून टीका केली. तुझे चाहते असलो तरी ही कृती मात्र आवडली नाही असं युजर्सनी सुनावलं आहे.

Loading...

दुसऱ्या कसोटीत स्मिथला रोखण्यासाठी इंग्लंडनं जोफ्रा आर्चरला संघात घेतलं. जोफ्रा आर्चरच्या भेदक माऱ्यानं स्मिथ बाद झाला नाही पण जखमी होऊन त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. स्टिव्ह स्मिथ 80 धावांवर खेळत असताना आर्चरचा उसळता चेंडू थेट स्मिथच्या मानेवर आदळला. त्यावेळी स्मिथ मैदानावर कोसळताच सर्व खेळाडूंसह प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला.

स्मिथ वर्ल्ड कपपासून फॉर्ममध्ये आहे. त्यानं पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात शतकी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात स्मिथला लवकर बाद करण्यासाठी इंग्लंडनं आर्चरला संघात घेतलं. तरीही स्मिथ मैदानावर टिकून होता. स्मिथच्या 70 धावा झाल्या असताना आर्चरचा एक चेंडू दंडावर आदळला होता. त्यानंतर 80 धावांवर खेळत असताना वेगवान चेंडू स्मिथच्या मानेवर आदळला. तेव्हा स्मिथ मैदानावर कोसळला. त्यावेळी स्मिथ हेल्मेट काढून तसाच पडून राहिला. डॉक्टरांच्या टीमने मैदानात त्याची तपासणी केली आणि अखेर त्याला मैदान सोडावं लागलं.

आर्चरचा चेंडू लागून स्मिथ मैदानावर कोसळला तेव्हा सर्वांना फिल ह्यूजेसची आठवण झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर स्मिथनं मैदान सोडलं. तेव्हा प्रेक्षकांनी स्मिथला उभा राहून अभिवादन केलं. स्मिथ मैदानाबाहेर गेला मात्र, सिडल बाद झाल्यानंतर तो पुन्हा परतला. 80 धावांमध्ये 12 धावांची भर घालून तो बाद झाला. वोक्सनं त्याला पायचित केलं. 161 चेंडूत 14 चौकारांच्या सहाय्यानं 92 धावा केल्या. त्याचं सलग तिसरं शतक हुकलं.

'माय नेम इज यश खान', मुस्लीम आडनावामुळे पिंपरी पोलिसांकडून नाट्य कलाकाराची झडती!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 18, 2019 12:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...