अ‍ॅशेस मालिका: इंग्लंडच्या प्रेक्षकांनी केला कहर, मैदानात रडताना दिसला स्टीव्ह स्मिथ!

अ‍ॅशेस मालिका: इंग्लंडच्या प्रेक्षकांनी केला कहर, मैदानात रडताना दिसला स्टीव्ह स्मिथ!

अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी स्ट्रीव्ह स्मिथचा रडतानाचा चेहरा पहायला मिळाला.

  • Share this:

लंडन, 01 ऑगस्ट: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. एजबेस्टन येथे सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पेन याच्या निर्णयाचा फार फायदा ऑस्ट्रेलियाला झाला नाही. ऑस्ट्रेलियाने आघाडीच्या 3 फलंदाजांना स्वस्तात गमावले. एका बाजूला इंग्लंडच्या गोलंदाजांनी मैदानात ऑस्ट्रेलियावर दबाव टाकला होता. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडच्या प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियावर दबाव टाकण्याची कोणताही संधी सोडली नाही. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी स्ट्रीव्ह स्मिथचा रडतानाचा चेहरा पहायला मिळाला. संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चेत असणाऱ्या या मालिकेच्या पहिल्या दिवशी काय झाले जाणून घ्या...

Ashes : अत्तराच्या बाटलीत राख असेलली प्रतिष्ठेची ट्रॉफी, जाणून घ्या रंजक इतिहास

अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाने डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरन बॅनक्रॉफ्ट यांनी संधी दिली आहे. या तिघांवर बॉल टेम्परिंग प्रकरणी बोर्डाने कारवाई करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना या तिघांनी चेंडूशी छेडछाड केल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. आता 16 महिन्यानंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या या तिघांना चिडवण्याची संधी इंग्लंडच्या प्रेक्षकांनी सोडली नाही. वॉर्नर, स्मिथ आणि बॅनक्रॉफ्ट बाद झाल्यानंतर प्रेक्षकांनी सॅडपेपर दाखवले. तर काही प्रेक्षकांनी स्मिथला चिडवण्यासाठी त्याच्या रडणाऱ्या चेहऱ्याचे मुखवटे घातले होते.

स्वस्तात बाद झाले तिघेही

16 महिन्यात नंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघात स्थान मिळवणाऱ्या वॉर्नरने 14 चेंडूत 2 धावा केल्या. स्टुअर्ट ब्रॉडने त्याला LBW केले. वॉर्नर बाद नव्हता कारण चेंडू विकेटच्या वरून जात होता. पण अंपायरच्या निर्णयावर वॉर्नरने डीआरएस घेतला नाही. त्यानंतर बॅनक्रॉफ्ट 25 चेंडूत 8 धावा करून ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद झाला.

VIDEO : 'मातोश्री'वरून 25 वेळा फोन आले, काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2019 07:01 PM IST

ताज्या बातम्या