Ashes : प्रेक्षकांच्या 'त्या' प्रश्नावर वॉर्नरने दाखवले रिकामे खिसे

Ashes : प्रेक्षकांच्या 'त्या' प्रश्नावर वॉर्नरने दाखवले रिकामे खिसे

बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर प्रेक्षकांमधून होणारी टीका कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे.

  • Share this:

लंडन, 04 ऑगस्ट : अॅशेसच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, कॅमरून बेनक्राफ्ट यांनी बंदीनंतर पुनरागमन केलं आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटीत चेंडूशी छेडछाड प्रकरणी तिघांवर बंदी घालण्यात आली होती. बंदीनंतर त्यांनी माफीही मागितली तरीसुद्धा प्रेक्षक त्यांच्याकडे संशयाच्या नजरेनं बघत आहेत. वर्ल्ड कपमध्येही चाहत्यांनी हूटींग केलं होतं.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा प्रेक्षकांनी वॉर्नरला लक्ष्य केलं. मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना चाहत्यांनी वॉर्नरला प्रश्न विचारला की, खिशात सँडपेपर तर नाही ना. त्यावेळी वॉर्नरने हसतच त्याचे दोन्ही खिसे बाहेर काढून दाखवले.

इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर पहिल्या डावात 90 धावांची आघाडी घेतली होती. दोन्ही डावात वॉर्नर लवकर बाद झाला. पहिल्या डावात दोन तर दुसऱ्या डावात 8 धावांवर बाद झाला. दुसरीकडे स्टीव्ह स्मिथने पहिल्या डावात शतक केलं तर दुसरा डावही त्यानं सावरला.

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत चेंडूशी छेडछाड प्रकरणी तिघेही दोषी आढळले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघावर टीकाही झाली होती. जिथे जाईल तिथे संघाच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले गेले. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची तर बेनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.

IND vs WI : एकेकाळी पैशांसाठी खेळायचा क्रिकेट, आता उडवतोय विंडीज फलंदाजांची झोप!

शाळेच्या शिपायाकडून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, धक्कादायक VIDEO VIRAL

Published by: Suraj Yadav
First published: August 4, 2019, 4:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading