भारत-श्रीलंका फायनल फिक्स होती, लंकेच्या माजी कॅप्टनचा आरोप

भारत-श्रीलंका फायनल फिक्स होती, लंकेच्या माजी कॅप्टनचा आरोप

मुंबई झालेला हा सामना फिक्स होता आणि याची चौकशी करावी अशी मागणीही रणतुंगा याने केलीये

  • Share this:

14 जुलै : 2011 चा भारत विरुद्ध श्रीलंका वर्ल्ड कप फायनल सामना हा फिक्स होता असा गौप्यस्फोट श्रीलंकेचा  माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने केल्यामुळे एकच खळबळ उडालीये. मुंबई झालेला हा सामना फिक्स होता आणि याची चौकशी करावी अशी मागणीही रणतुंगा याने केलीये. या सामन्यात भारताने श्रीलंकेला सहा विकेटने हरवून 28 वर्षांनंतर वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं होतं.

श्रीलंकेचं इंग्रजी वृत्तपत्र डेली मिररने दिलेल्या बातमीनुसार, माजी कॅप्टन कुमार संगाकाराने 2009 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असताना एक विधान केलं होतं. या दौऱ्यात लंकेच्या टीमवर दहशतवादी हल्ला झाला होता. पाकचा हा दौरा कुणाच्या सांगण्यावर करण्यात आला होता याची चौकशी व्हावी अशी मागणी संगकाराने केलीये.

संगकाराच्या मागणीनंतर  अर्जुन रणतुंगा यांनी खळबळजनक खुलासा केलाय. संगकारा पाकिस्तान दौऱ्याच्या चौकशीची मागणी करतोय. पण मला तर वाटतंय की 2011 चा वर्ल्डकप फायनलमध्ये श्रीलंकेसोबत जे झालंय त्याची ही चौकशी झाली पाहिजे. आमच्या क्रीडा मंत्र्यांने फिटनेस सारख्या समस्यांचा विचार सोडून अशा प्रकरणावर लक्ष्य द्यावं अशी मागणी त्याने केली.

वर्ल्ड कपच्या फायनलच्या वेळी मी काॅमेंट्री पॅनलमध्ये होतो. मला लंकनं टीमचा खेळ पाहुन निराशा आली होती. मी सांगू शकत नाही त्यादिवशी काय झालं होतं. पण एक दिवस मी सत्य बाहेर आणेल. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही रणतुंगाने केलीये.

रणतुंगा हे आता लंकनं सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्री आहे. सीलोन पेट्रोलियम निगमच्या एका कार्यक्रमात त्यांनीही गौप्यस्फोट केलाय.

2011 च्या वर्ल्डकपमध्ये लंकनं टीमचा कॅप्टन संगकारा होता. जेव्हा  मार्च 2009 मध्ये लंकनं टीम पाकदौऱ्यावर गेली होती तेव्हा लाहोरमध्ये लंकेच्या खेळाडूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात पाकच्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर लंकेचे काही खेळाडू जखमी झाले होते. या घटनेनंतर लंकेनं एकदाही पाकचा दौरा केला नाही.

वर्ल्डकप फायनलमध्ये श्रीलंकेनं पहिली बॅटिंग करत भारताला 274 धावांचं आव्हान दिलं होतं. यात सलामी आलेल्या गौतम गंभीरने 97 रन्स तर कॅप्टन महेंद्र सिंग धोणीने नाबाद 91 रन्सची शानदार खेळी करत टीम इंडियाचा विजयाचा मार्ग मोकळा केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading