लंडन, 18 जून : इंग्लंडमध्ये ICC Cricket World Cup चा महासंग्राम सुरु आहे. त्याचवेळी एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेत अर्जुन तेंडुलकर खेळत आहे. या स्पर्धेतील त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्जुनने नॅथन टायली या फंलदाजाला बोल्ड केल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. अर्जुनच्या गोलंदाजीचं सध्या कौतुक केलं जात आहे.
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेत अर्जुन तेंडुलकर एमसीसी यंग क्रिकेटर्स संघातर्फे खेळत आहे. एमसीसीचा काही दिवसांपूर्वी सरे इलेव्हन संघाविरुद्ध सामना झाला. या सामन्यात गोलंदाजी करताना अर्जुनने फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. डावखुरा गोलंदाज असलेल्या अर्जुनने टाकलेल्या चेंडूवर फलंदाज चकला आणि बाद झाला. अर्जुनच्या या गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
😳 Arjun Tendulkar, take a bow!
— Lord's Cricket Ground 🏏 (@HomeOfCricket) June 17, 2019
He took this stunning wicket this morning for @MCCYC4L.
Follow their progress versus @SurreyCricket 2nd XI ➡️ https://t.co/Vs5CtV2o8N#MCCcricket pic.twitter.com/5Mb3hWNI70
यानंतर अर्जुननं बीबीएल गेड्स याला बाद केले. आपल्या 11 ओव्हरमध्ये अर्जुननं 50 धावा देत 4.55च्या सरासरीनं 2 विकेट घेतल्या. यात चार मेडन ओव्हरचा समावेश आहे. इंग्लंडमध्ये जाण्याआधी मुंबईच झालेल्या मुंबई टी-20 लीगमध्ये अर्जुननं आकाश टायगर्सकडून चांगली गोलंदाजी केली होती.
वाचा- सानियानं काढला 'ती'च्यावर राग म्हणाली, 'मी पाकिस्तान संघाची आई नाही'
वाचा-World Cup : इंग्लंडची चिंता वाढली, ऐन वर्ल्ड कपमध्ये बदलावा लागणार कर्णधार
वाचा- World Cup : ठरलं ! 'या' चार संघांना मिळणार सेमीफायनलचे तिकीट
लाजा धरा लाजा, पाकच्या आजीनी सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल