मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराट आणि अनुष्कानं केलं लंडनच्या हॉटेलमध्ये लंच, फॅन्समध्ये रंगली Vamika बद्दल चर्चा

विराट आणि अनुष्कानं केलं लंडनच्या हॉटेलमध्ये लंच, फॅन्समध्ये रंगली Vamika बद्दल चर्चा

इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स टेस्टमध्ये (India vs England 2nd Test) जोरदार विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीनं (Virat Kohli) त्याची पत्नी अनुष्का शर्मासह (Anushka Sharma) सेलिब्रेट केले.

लंडन, 19 ऑगस्ट : इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स टेस्टमध्ये (India vs England 2nd Test) जोरदार विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीनं (Virat Kohli) त्याची पत्नी अनुष्का शर्मासह (Anushka Sharma) सेलिब्रेट केले. या दोघांनी लंडनमधील एका शाकाहारी हॉटेलमध्ये लंच घेतले. विराट कोहली आणि टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का सध्या लंडनमध्ये आहे. या दोघांचा हा फोटो सध्या व्हायरल (Photo Viral) झाला आहे.

tendril kitchen या इन्स्टाग्रामपेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. 'विराट कोहली आणि अनुष्का शर्मा तुम्ही संचला आलात आणि इथे येऊन तुम्हाला आनंद झाला, याचे समाधान आहे.' असं कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे.

विराट आणि अनुष्काचा हा फोटो चांगलाच व्हायरल झालाय. पण त्यांच्यासोबत या फोटोत त्यांची मुलगी वामिका (Vamika Kohli) नाही. त्यामुळे वामिकाच्या अनुपस्थितीचीच जोरदार चर्चा रंगली आहे.  विराट आणि अनुष्कानं वामिकाचा फोटो सोशल मीडियावर न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

IND VS ENG: मोहम्मद सिराजच्या बॉलिंगचे पाकिस्तानमध्येही फॅन, महिला पत्रकार म्हणाली...

" तिला सोशल मीडिया काय आहे हे समजत नाही आणि ती त्यावर स्वत:हून निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही कपल म्हणून बाळाला सोशल मीडियावर न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे." असे विराटने सांगितले होते.  वामिकाचा जन्म 11 जानेवारी रोजी झाला. तिच्या जन्मानंतर काही दिवसांनी विराट आणि अनुष्कानं पापारझ्झींना (Paparazzi) पत्र लिहून कृपया आमच्या नवजात बाळाचे (मुलीचे) फोटो काढू नका, अशी विनंती केली होती.

First published:

Tags: India vs england, Virat kohli and anushka sharma