मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

अनुराग कश्यप प्रकरणी पायल घोषने घेतलं टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचं नाव

अनुराग कश्यप प्रकरणी पायल घोषने घेतलं टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचं नाव

 अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) हिने काही दिवसांपूर्वी अनुराग कश्यप (Anurag Kashyap)याच्यावर बलात्काराचा आरोप करत एफाआयआर दाखल केला होता, एवढच नाही तर तिने सुरक्षा देण्याचीही मागणी केली होती.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 18 ऑक्टोबर : अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) हिने काही दिवसांपूर्वी अनुराग कश्यप (Anurag Kashyap)याच्यावर बलात्काराचा आरोप करत एफाआयआर दाखल केला होता, एवढच नाही तर तिने सुरक्षा देण्याचीही मागणी केली होती. या प्रकरणात आता पायल घोषने भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण नाव घेतलं आहे. पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात अनेक ट्विट केली, यामध्ये तिने इरफान पठाण (Irfan Pathan)च्या नावाचा उल्लेख केला. 'मी याबाबत माझा मित्र इरफान पठाणशीही बोलले. पठाणला मी अनुराग कश्यपने माझ्यावर बलात्कार केला, हे सांगितलं नाही. पण इरफानशी बोलताना मी त्याला सगळं काही सांगितलं. मी त्याला प्रत्येक गोष्ट सांगितली, पण त्याने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. कधीकाळी तो आपण चांगले मित्र असल्याचा दावा करायचा,' असं पायल म्हणाली आहे. सोबतच तिने इरफान पठाणसोबतचा एक फोटोही शेयर केला आहे. पहिला फोटो ट्विट केल्यानंतर जवळपास दोन तासांनी पायल घोषने इरफान पठाणसोबतचा आपला फोटो शेयर केला, तसंच तिने इरफानला टॅगही केलं. इरफान पठाणला टॅग केलं, म्हणजे मला त्याच्यात रस आहे, असा अर्थ नाही. पण कश्यपने माझ्यासोबत जे केलं ते मी इरफानला सांगितलं, बलत्कार सोडून, असं पायल ट्विटमध्ये म्हणाली आहे. 'मी त्याच्यासोबत जे काही बोलले त्यावर तो बोलेल, अशी माझी अपेक्षा आहे मी फक्त त्याची मैत्रिणच नाही, तर मी त्याची कौटुंबिक मैत्रिण होते. मैत्रीला कोण जागतं, ते बघू,' असं ट्विट पायलने केलं आहे. सप्टेंबर महिन्यात पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. यानंतर अनुराग कश्यपची पोलीस चौकशीही झाली. अनुराग कश्यपने हे आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचं सांगितलं.
First published:

पुढील बातम्या