Home /News /sport /

IPL 2021: राजस्थान रॉयल्सला आणखी एक धक्का, बेन स्टोक्सचा सहभाग अनिश्चित

IPL 2021: राजस्थान रॉयल्सला आणखी एक धक्का, बेन स्टोक्सचा सहभाग अनिश्चित

आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनचा (IPL 2021) दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सची (Rajasthan Royals) वाटचाल खडतर झाली आहे.

    मुंबई, 22 ऑगस्ट : आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनचा (IPL 2021) दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सची  (Rajasthan Royals) वाटचाल खडतर झाली आहे.  जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि जोस बटलर (Jos Buttler) या राजस्थानच्या खेळाडूंनी या स्पर्धेतून यापूर्वीच माघार घेतली आहे. आता त्यापाठोपाठ ऑल राऊंडर बेन स्टोक्सचाही (Ben Stokes) स्पर्धेतील सहभाग अनिश्चित आहे. बेन स्टोक्सनं मागच्या महिन्यात मानसिक कारण देत क्रिकेटमधून अनिश्चित ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. त्यानं यापूर्वी बराच काळ बायो बबलमध्ये (Bio Secure Bubble) कुटुंबापासून दूर घालवला आहे. आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात पंजाब किंग्ज विरुद्ध फिल्डिंग करताना त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे स्टोक्स आयपीएलमधून बाहेर पडला होता. त्यानंतर तो पाकिस्तान विरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये खेळला होता. इंग्लंडचे प्रमुख खेळाडू आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात खेळणार नाहीत. या निर्णयाला क्रिकेट बोर्डाचे (ECB) संचालक एश्ले जाईल्स यांनी पाठिंबा दिला आहे. 'बेन स्टोक्सनं त्याच्या भावना उघडपणे व्यक्त करण्याचं धाडस दाखवलं आहे. सर्व खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर आमचे नेहमी लक्ष आहे, आणि यापुढेही असेल.' असं त्यांनी सांगितलं. 'कुटुंबापासून बराच काळ दूर राहणे हे अतिशय आव्हानात्मक आहे. गेल्या 16 महिन्यांमध्ये या प्रकारच्या वातावरणाचा  (Bio Secure) सर्वांवर प्रभाव पडला आहे. बेनला आवश्यकता असेल तोपर्यंत विश्रांती देण्यात आली आहे. आम्ही भविष्यात त्याला इंग्लंडकडून क्रिकेट खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहोत.'  असं जाईल्स यांनी स्पष्ट केले. जगातील सर्वात महागड्या बॅटचा आहे धोनी मालक, किंमत वाचून व्हाल थक्क! जोस बटलरची माघार राजस्थान रॉयल्सचा महत्त्वाचा खेळाडू जॉस बटलर (Jos Butller) आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांमध्ये खेळणार नाही. जॉस बटलरची पत्नी लुईस दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे, त्यामुळे बटलर आयपीएल खेळणार नाही. जॉस बटलरच्याऐवजी राजस्थान रॉयल्सने न्यूझीलंडचा विकेट कीपर ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) याची आयपीएलच्या उरलेल्या मोसमासाठी निवड केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ben stokes, Cricket news, IPL 2021, Rajasthan Royals

    पुढील बातम्या